राजर्षी शाहूंचे चरित्र रशियन, चिनी भाषेत

By admin | Published: November 14, 2016 05:19 AM2016-11-14T05:19:17+5:302016-11-14T05:19:17+5:30

राजर्षी शाहू छत्रपती यांचे चरित्र आता रशियन आणि चिनी भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे संस्थापक-संचालक व मूळ

Rajarshi Shahu's character is Russian, in Chinese language | राजर्षी शाहूंचे चरित्र रशियन, चिनी भाषेत

राजर्षी शाहूंचे चरित्र रशियन, चिनी भाषेत

Next

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती यांचे चरित्र आता रशियन आणि चिनी भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे संस्थापक-संचालक व मूळ मराठी ग्रंथाचे लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ही माहिती दिली.
डॉ. पवार म्हणाले, २००१ मध्ये प्रसिद्ध झालेले शाहू चरित्र कानडी, कोकणी, उर्दू, तेलगू, हिंदी, इंग्रजी व जर्मन अशा देशी-विदेशी भाषांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. एकूण १४ भारतीय भाषांत व १० विदेशी भाषांत शाहू ग्रंथ प्रकाशित करण्याचा संस्थेचा मानस आहे.
सामाजिक कार्यकर्त्या व रशियन भाषातज्ज्ञ डॉ. मेघा पानसरे व प्रा. तत्याना बीकवा यांनी चरित्राचा रशियन भाषेत अनुवाद केला आहे. हा ग्रंथ लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. चिनी भाषातज्ज्ञ प्रा. ओ ताई ली कोल्हापुरात आल्या असून, त्यांनी शाहू जन्मस्थळापासून महाराजांशी संबंधित सर्व स्थळांना भेटी दिल्या आहेत. चिनी भाषेत अनुवादाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rajarshi Shahu's character is Russian, in Chinese language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.