पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजेंद्र दौंडकर
By Admin | Published: January 31, 2017 11:09 PM2017-01-31T23:09:03+5:302017-01-31T23:09:03+5:30
पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. राजेंद्र दौंडकर यांची बहुमताने निवड झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 31 - पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. राजेंद्र दौंडकर यांची बहुमताने निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या तिरंगी लढतीमध्ये ३ हजार ६५५ मते घेऊन अॅड. दौंडकर यांनी विजय मिळविला. उपाध्यक्षपदी अॅड. हेमंत झंजाड आणि अॅड़ संतोष जाधव यांची निवड झाली आहे. त्यांना अनुक्रमे ३ हजार १९१आणि २ हजार १४९ मते मिळाली. सचिवपदी अॅड़ विवेक भरगुडे (२ हजार ६३७मते) आणि अॅड़ अशिष ताम्हाणे (१ हजार ६५३) विजयी झाले. खजिनदारपदी अॅड़ दत्तात्रय गायकवाड (१ हजार ३६३ मते) यांची निवड झाली़ हिशेब तपासणीस पदी अॅड़ कुमार पायगुडे (२ हजार ९७९) यांची निवड झाली़
कार्यकारिणी सदस्यपदी अॅड़ ओंकार चव्हाण, अॅड़ योगिनी गायकवाड, अॅड़ ज्योती जाधव, अॅड़ श्रीकांत काळभोर, अॅड़ स्वप्नील काळे, अॅड़ अमित खोत, अॅड़ सुनील क्षीरसागर, अॅड़ संतोष मोटे, अॅड़ अनुप पाटील, अॅड़ अभिजित पोळ या १० जणांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे.
पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी ५ हजार १५७ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. पोलीस निरीक्षक नितीन कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली जाधव आणि सहाय्यक पोलीस फौजदार प्रताप बिरंजे यांनी लावलेल्या चोख बंदोबस्तामुळे निवडणूक सुरळीतपणे पार पडली. सलग तिसऱ्या वर्षी बारच्या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा वापर करण्यात आला. जिल्हा न्यायालयातील अशोका हॉल, जेन्टस बार रुम आणि नवीन इमारतीसमोरील अशा तीन निवडणूक केंद्रात २४ इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे मतदान घेण्यात आले. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अॅड़ एकनाथ सुगावकर यांनी काम पाहिले. अॅड. प्रवीण नलावडे, अॅड. संजय दळवी, अॅड. शिरीष शिंदे यांनी सह-निवडणूक अधिकारी म्हणून, तर अॅड. अमरसिंह पाटील, अॅड. यशवंत खराडे, अॅड. ज्ञानेश्वर बर्डे, अॅड. स्मिता देशमुख आणि अॅड. माधवी परदेशी यांनी सदस्य म्हणून काम पाहिले.