rajendradarda.com डायनॅमिक संकेतस्थळाचे उदघाटन
By Admin | Published: November 22, 2015 08:30 AM2015-11-22T08:30:50+5:302015-11-22T08:30:50+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या डायनॅमिक स्वरूपातील rajendradarda.com या संकेतस्थळाचे उदघाटन आज त्यांच्या वाढदिवशी चाहत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि.२२ - लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या डायनॅमिक स्वरूपातील rajendradarda.com या संकेतस्थळाचे उदघाटन आज त्यांच्या वाढदिवशी चाहत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राजेंद्र दर्डा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह त्यांच्या चाहत्यांची लोकमत भवनात रीघ लागली होती. या चाहत्यांच्या गराड्यात माऊसद्वारे क्लिक करून राजेंद्र दर्डा यांनी या आधुनिक संकेतस्थळाचे उदघाटन केले.
उपस्थित मान्यवर व चाहत्यांशी हितगुज करताना राजेंद्र दर्डा यांनी या संकेतस्थळाविषयीची भूमिका विशद केली. सन २००० मध्ये त्यावेळच्या तंत्रज्ञानासह हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. त्यानंतर सर्वसामान्यांशी थेट आदान-प्रदान करणा-या फीचरसह २०१२ मध्ये हे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले. आता माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे संकेतस्थळ पाहण्याचे माध्यमही बदलले आहे. त्यामुळे डेस्कटॉपसह स्मार्टफोन व टॅब्लेटवर सहज पाहता येईल अशा फीचर व आकर्षक डिझाईनसह डायनामिक स्वरूपात rajendradarda.com हे संकतेस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे.
राजेंद्र दर्डा म्हणाले की, माझ्या आयुष्यातील सर्व महत्त्वाचे क्षण, प्रसंग, स्मृती व विविध क्षेत्रातील कामगिरी भविष्यात अभ्यासकांना विश्वासार्ह संदर्भ म्हणून निश्चितपणे उपयोगी ठरू शकेल, असा लेखाजोखा या अत्याधुनिक संकेतस्थळावर टाकण्यात आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण व चित्रे या संकेतस्थळावर मी शेअर केली आहेत. यवतमाळातील बालपण, १९७४ मध्ये परदेशातून परतल्यावर नागपूर, जळगाव व औरंगाबादेतील वास्तव्य, बातमीदारीपासून तर संपादक म्हणून अग्रलेखांपर्यंतची दीर्घकाळ केलेली सक्रिय पत्रकारिता, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, आंतरराष्ट्रीय नेत्यांसमवेत पत्रकार म्हणून केलेल्या दौ-यांचे वार्तांकन, लेख, मुलाखती, छायाचित्रे, विविध दैनिकांत व पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे, मिळालेले सन्मान, भाषणांचे व्हिडिओ, झुंबर, व्हायब्रंट न्हिनगेट व आमचे विद्यापीठ ही पुस्तके, राजकारणातील प्रवेश, उत्कृष्ट संसदपटू, आमदार, राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री म्हणून केलेले दीड दशकातील काम, देशातील सर्व राज्यांच्या मंत्र्यांच्या कार्यगटाचे नेतृत्व, विविध देशातील शिष्टमंडळांशी चर्चा, उद्योग व शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय आदींचा आढावा लेख, बातम्या व छायाचित्रांच्या माध्यमातून rajendradarda.com या संकेतस्थळावर घेण्यात आला आहे.
या संकेतस्थळावर आकर्षक होमपेज, प्रोफाईल, अॅचिव्हमेंटस्, भाषणे, आर्टिकल्स, फोटो गॅलरी, व्हिडिओ, न्यूज व अपडेटस् आणि फीडबॅक असे भाग करण्यात आले आहेत.