राजूर घाट बनला आपत्तीचा डोंगर; दरड कोसळल्यामुळे धोका
By Admin | Published: August 1, 2016 08:01 PM2016-08-01T20:01:35+5:302016-08-01T20:01:35+5:30
बुलडाणा शहराला मलकापूर मार्गावर जवळपास ४ कि़मी.चा वळणदार घाट लाभला आहे. मात्र, या घटातून जाणा-या
- नीलेश शहाकार
बुलडाणा, दि. १ - बुलडाणा शहराला मलकापूर मार्गावर जवळपास ४ कि़मी.चा वळणदार घाट लाभला आहे. मात्र, या घटातून जाणा-या रस्त्यावर पावसाळ्यात वारंवार भूस्खलन होत असल्यामुळे घाटातून प्रवास करणा-या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
शहराच्या चारही बाजूंनी अजिंठा डोंगर आहेत.त्यामुळे शहराचा विस्तार थेट डोंगररांगांपर्यंत झाला आहे. शहरातून बाहेर निघाणाºया मुख्यमार्गापैकी बोथाघाट मार्गे खामगाव, अकोला शहराला जातो.तर राजूर घाटातून मोताळा, मलकापूर व पुढे मध्यप्रदेशात जाण्याचा मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग शहरासाठी महत्वाचे आहे.
यापैकी राजूर घाटातील मार्ग वळणार व जास्त जोखमीचा असून येथून होणारी वाहतून जास्त व्यस्त आहे.मात्र या घाटात असणा-या डोंगर मुरमाड खडकाचा बनला असून अती पाऊस पडला की, माती भुसभुशीत होवून डोंगरातील दगड
रस्त्यावर येवून पडतात. त्यामुळे घाटातील वळण रस्त्यांवर दगडांचा मोठा ढिग साचलेला दिसतो.
घटात ब-याच ठिकाणी धोकादायक वळण असून नेमके त्याच ठिकाणी भूस्खलन होवून रस्त्यावर व रस्त्यालगत मोठी दगड पडलेली असतात. त्यामुळे ब-याचवेळा रात्रीच्यावेळी ही भरधाव वाहनांच्या चाकाखाली हे दगड आल्यामुळे वाहनाला
अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहे. ब-याच अपघातात नागरिक जखमी झाले तर काहीचे जिवही गेले आहे.
रात्री मोठ्या वाहनांचा धोका रात्रीच्या वेळी बोधा घाटातील मार्ग बंद राहत असल्यामुळे मध्यप्रदेशकडे जाणा-या मोठ्या वाहनाची राजूर घाटातून वर्दळ असते. शिवाय मलकापूर व मोताळाकडे जाणा-या नागरिकही याचा मार्गाने प्रवास करतात. ब-याचवेळा राजूर घाटात घडलेली लहानमोठ्या अपघाताची मालिका मोठी आहे.
वर्षभरात अपघाताची मालिका मात्र वर्षभरात तब्बल पंधार अपघाताची नोंद आहे. यात श्री हनूमान मंदीरानजिक वळमार्गावर तेलाचे टँकर पडल्याची घटना ताजी आहे.तर काही महिण्यापुर्वी मलकापूरला जाणा-या बसच्या चाकाखाली दगड येवून ती पडली झाली होती. सुदैवाने यात हानी झाली. शिवाय डोंगरातील दगड पडून गाडीच्या काचा, नागरिकांची डोके फुटण्याच्या घटनाही नेहमीच्या आहे.