मडगावात बांगलादेशीयाकडून राजरोस वेश्या व्यवसाय
By admin | Published: August 27, 2016 09:31 PM2016-08-27T21:31:34+5:302016-08-27T21:31:34+5:30
वेश्या व्यवसाय केवळ उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातच फोफावलाय असे नव्हे तर अगदी मडगावातही हा व्यवसाय राजरोस चालू आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
मडगाव, दि. 27 - वेश्या व्यवसाय केवळ उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातच फोफावलाय असे नव्हे तर अगदी मडगावातही हा व्यवसाय राजरोस चालू आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे बांगलादेशी नागरिकाकडून हा वेश्या अड्डा चालू होता. फरार असलेल्या या बांगलादेशातील व्यावसायिकांना अटक करण्यात पोलीस अपयशी ठरलेत.
काही दिवसांपूर्वी मेरशी येथील महिला सुधारगृहातून पळून गेलेल्या बांगलादेशी युवतींच्या प्रकरणातून आता ही गोष्ट उजेडात आली आहे. एकूण नऊ युवतींबरोबर बांगलादेशातीलही काही युवती पळून गेल्या होत्या. त्यापैकी दोन मडगावातून या व्यवसायातून मुक्त केलेल्या होत्या. त्यापैकी एक युवती सापडली दुसरीचा ठाव लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीप्रमाणो, रिझाऊल अली या बांगलादेशी एजंटने या दोन्ही युवतींना मडगावात आणले होते. दवर्ली येथे राहाणा:या इम्रान या व्यक्तीच्या साहाय्याने मडगावात हा वेश्या अड्डा चालविला जात होता. इम्रानला मरियम व झोया या दोन महिलाही साहाय्य करायच्या. या दोन्ही महिला बांगलादेशी असून इम्रानने त्यांच्याशी लग्न केले होते. इम्रानने दवर्ली-हाउसिंग बोर्डमध्ये दोन घरे भाडय़ाने घेतली होती. त्या दोन्ही घरांत त्याने मरियम व झोयाला ठेवले होते. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या युवतींना इम्रान याच आपल्या पत्नींकडे ठेवायचा, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे. मरियमच्याच माध्यमातून रिझाऊलने बांगलादेशाच्या त्या दोन युवतींना मडगावात आणले, अशी माहिती प्राप्त झाली आहे. बांगलादेशी इसमाकडून मडगावात हा वेश्या व्यवसाय कित्येक महिने चालू होता. मात्र, या युवती पोलिसांच्या हाती सापडल्यानंतर या सर्व आरोपींनी मडगावातून पळ काढला.
पोलिसांनी ज्या दोन बांगलादेशी युवतींची मुक्तता केली होती त्या युवतींना बांगलादेशातील बोराशोर या जिल्हय़ातून गोव्यात आणले होते. इम्रानने त्यापैकी एका युवतीला मरियमकडे तर दुस:या युवतीला झोयाकडे ठेवले होते. वास्तविक गि:हाईक हेरून वेश्या व्यवसायातील युवतीला त्या गि:हाईकाकडे नेऊन सोडणो ही वेश्या व्यवसायातील नेहमीची पद्धत असते. मात्र, येथे हा अड्डा चालविणा:या इम्रानचा कोणाला संशय येऊ नये यासाठी गि:हाईकाचा दूरध्वनी क्रमांक या व्यवसायात गुंतविलेल्या युवतींना देऊन त्यांनाच एकटय़ाने गि:हाईकाकडे पाठवीत. त्यासाठी माडेल-मडगाव येथील एक फ्लॅट घेतला होता.
पोलिसांना या व्यवसायाची कुणकुण लागल्यानंतर पाठविलेल्या एका तोतया गि:हाईकाच्या माध्यमातून पोलिसांना या रॅकेटचा पत्ता लागला होता. त्यापैकी एका युवतीला कोलवा येथे तर दुस:या युवतीला मडगाव बसस्थानकात पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस इम्रानच्या दवर्लीतील त्या घरी गेले असता, त्यांना आणखी एक मुलगी सापडली होती. जिला घरकामासाठी म्हणून बांगलादेशातून आणून प्रत्यक्षात वेश्या व्यवसायास जुंपले होते.
यासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी मडगावचे पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते रजेवर असल्याने तो होवू शकला नाही.
लग्नाच्या आमिषाने गोव्यात
मडगाव पोलिसांनी या व्यवसायातून ज्या दोन युवतींची सुटका केली, त्यापैकी एका युवतीशी आरोपी रिझाऊल अली याने बांगलादेशात लग्न केले होते. वास्तविक त्या युवतीचे त्यापूर्वीच लग्न झाले होते. मात्र, तिचे पतीशी पटत नव्हते. याचाच फायदा रिझाऊलने उठवून तिच्याशी लग्नाचा बहाणा केला आणि तिला मडगावात आणले. मडगावात आल्यावर आपल्याकडचे पैसे संपले आहेत असे सांगून रिझाऊलने तिला मरियमच्या ताब्यात दिले. त्या दिवसापासून तिला वेश्या व्यवसायात जुंपले. हीच युवती नंतर मेरशीच्या सुधारगृहातून पळाली, जिचा पत्ता लागलेला नाही. याच मरियमने दुस:या युवतीलाही रिझवानच्याच माध्यमातून मडगावात आणले. रिझवानने यासाठी बांगलादेशातील दुस:या एका भावाचा आधार घेतला. या भावानेही त्या युवतीशी प्रेमसंबंध जोडून तिला रेल्वेत बसवून गोव्यात पाठवून दिले. ती युवती आयतीच या वेश्या व्यवसायातील दलालाच्या हाती सापडली. या युवतीनेही सुधारगृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला बंगाली भाषा सोडून अन्य कोणतीही भाषा समजत नसल्याने ती पुन्हा या सुधारगृहात आली, अशी माहिती अर्ज या संघटनेचे अरुण पांडे यांच्याकडून प्राप्त झाली.
केवळ आठ हजारांत बॉर्डर पार
बांगलादेशातून भारतात ज्या युवतींची तस्करी केली जाते ती एक तर नोकरीचे किंवा लग्नाचे आमिष दाखवून. ज्या दोन युवतींना अशाचप्रकारे बांगलादेशातून कोलकात्यात आणले गेले त्यासाठी एजंटला आठ हजार रुपये दिल्याची माहिती मिळाली. केवळ आठ हजारांत अशाप्रकारे बॉर्डर पार केली जाते. अशा सहजपणो जर युवतींची भारतात तस्करी केली जाते तर त्याच मार्गाने अतिरेकीही येऊ शकतात, अशी भीती काही अधिका:यांनी व्यक्त केली.