शिवसेनेला गाफील ठेऊन राज यांचा 'मोके पे चौका'

By Admin | Published: August 18, 2016 02:51 PM2016-08-18T14:51:37+5:302016-08-18T14:51:37+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे राजकारणात अचूक टायमिंग साधण्यासाठी ओळखले जातात. प्रतिस्पर्धी गाफील असताना मिळालेल्या संधीचा राजकीय फायदा उचलण्यात राज ठाकरे तरबेज आहेत.

Raj's 'Moke Pe Chaukha' by confusing Shivsena | शिवसेनेला गाफील ठेऊन राज यांचा 'मोके पे चौका'

शिवसेनेला गाफील ठेऊन राज यांचा 'मोके पे चौका'

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १८ - मनसे अध्यक्ष राज ठाकरे राजकारणात अचूक टायमिंग साधण्यासाठी ओळखले जातात. प्रतिस्पर्धी गाफील असताना मिळालेल्या संधीचा राजकीय फायदा उचलण्यात राज ठाकरे तरबेज आहेत. दहीहंडीसंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करतानाही राज यांनी हेच टायमिंग साधले आहे. 
 
कारण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असला तरी, दहीहंडी उत्सवात सहभागी होणारे लाखो गोविंदा या निर्णयावर नाराज होते. राज यांनी जाहीरपणे २० फूट उंचीवरुन गोविंदा पथकांची बाजू उचलून धरताना, हिंदू सणांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. म्हणजेच एकाच दगडात राज यांनी दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. 
 
आणखी वाचा 
स्टूलावर उभं राहून हंडी फोडायची का ? - राज ठाकरेंची कोर्टावर टीका
 
२००८-०९ मध्ये त्यांनी एकापाठोपाठ एक मराठी माणसाचे मुद्दे उचलून धरले होते. मराठी पाटया, रेल्वेतील नोकरभरती, म्हाडामध्ये मराठी माणासाला घर इत्यादी मराठी माणसांचे मुद्दे उचलून धरताना त्यांनी शिवसेनेची पुरती गोची केली होती. त्यावेळी गाफील असलेली शिवसेना राज यांच्या लागोपाठच्या हल्ल्यांमुळे निष्प्रभ झाली होती. शिवसेनेपेक्षा आपला पक्ष मराठी माणसाचे नेतृत्व करण्यास अधिक सक्षम असल्याचा मुद्दा मराठी मतदारांना पटवून देण्यात ते यशस्वी ठरले होते. 
 
त्याचा २००९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मोठा फायदाही झाली होता. २०१४ मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दारुण पराभवानंतर मनसेला गळती लागल्यामुळे राज शांत दिसत होते. 
 
आता दहीहंडीच्या मुद्यावरुन त्यांनी गोविंदा उत्सवात सहभागी होणारे लाखो तरुण आणि हिंदूत्वाच्या मुद्यावरुन गमावलेला मतदार आणि विश्वास पुन्हा मिळवण्याची खेळी खेळली आहे. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये कदाचित या व्यूहरचनेचा फायदा राज ठाकरे यांच्या मनसेला होऊ शकतो. 

Web Title: Raj's 'Moke Pe Chaukha' by confusing Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.