22 तारखेपासून राज यांचे उद्धवना फोन - बाळा नांदगावकर
By admin | Published: January 30, 2017 06:28 PM2017-01-30T18:28:31+5:302017-01-30T18:40:38+5:30
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्याची राज ठाकरे यांची इच्छा होती.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्याची राज ठाकरे यांची इच्छा होती. मी स्वत: मातोश्रीवर जाऊन युतीचा प्रस्ताव दिला होता. पण उद्धव ठाकरे युतीचा प्रस्ताव मिळाला नाही असे म्हणत असतील तर मी खोटे बोलतोय असा त्याचा अर्थ होतो, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
आम्ही युतीचा प्रस्ताव दिला त्यामध्ये कोणतीही अट ठेवली नव्हती. छोटा भाऊ नात्याने मनसे युतीसाठी तयार आहे असे नांदगावकर यांनी सांगितले. मुंबईच्या हितासाठी आम्ही प्रस्ताव दिला होता, असे नांदगावकरांनी सांगितले.
22 जानेवारीपासून राज यांनी उद्धव ठाकरेंना फोन केले असे नांदगावकर यांनी सांगितले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी कोणाकडूनही युतीचा प्रस्ताव मिळाला नाही. कोणाशीही युती करणार नाही असे सांगितले. त्यानंतर बाळा नांदगावकरांनी पत्रकार परिषद घेऊन मातोश्री भेटीचा खुलासा केला.