Maharashtra Politics: “महाविकास आघाडीत जाणं म्हणजे असंगाशी संग करणं”; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं कुणासोबत जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 10:27 AM2022-11-01T10:27:49+5:302022-11-01T10:28:30+5:30

Maharashtra News: लोकोपयोगी सरकार असल्याची साधी चुणूकही या शंभर दिवसात दाखवलेली नाही, असे सांगत राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

raju shetti clears stand over maha vikas aghadi alliance or balasahebanchi shiv sena and bjp yuti | Maharashtra Politics: “महाविकास आघाडीत जाणं म्हणजे असंगाशी संग करणं”; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं कुणासोबत जाणार

Maharashtra Politics: “महाविकास आघाडीत जाणं म्हणजे असंगाशी संग करणं”; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं कुणासोबत जाणार

googlenewsNext

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीचे नवे सरकार स्थापन झाले. महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत टीका केली होती. आता भाजप-शिंदे गट युतीचे नवे सरकार आल्यावर कोणासोबत जाणार, हे राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच महाविकास आघाडीत जाणे म्हणजे असंगाशी संग करणे होय, अशी घणाघाती टीकाही राजू शेट्टी यांनी केली. 

राजू शेट्टी नक्की महाविकास आघाडी की युतीचा (Yuti) भाग असणार याची चर्चा सुरु होती. त्यावर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजू शेट्टी यांनी कुणाशीही युती किंवा आघाडी न करता ‘एकला चलो रे’ची भूमिका त्यांनी घेतली आहे. महाविकास आघाडीत जाणे म्हणजे असंगाशी संग करणे होय, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. 

आम्ही स्वतंत्रपणे दोन्ही आघड्यापासून दूर राहणार

निवडणुका लढवणे किंवा राजकारण करणे हा आमचा धंदा नाही. शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी, वेगवेगळ्या सभागृहात प्रतिनिधी पाठवण्यासाठी आम्ही असंगाशी संग करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यात आम्हाला चांगले अनुभव आला नाही. त्यामुळे यापुढे आम्ही महाविकास आघाडी किंवा भाजप यांच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतंत्रपणे दोन्ही आघड्यापासून दूर राहत कार्य करणार, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे बोलतात

कोणत्याही सरकारचे १०० दिवसात परीक्षण करता येत नाही. या सरकारने आपण लोकोपयोगी सरकार असल्याची साधी चुणूकही या शंभर दिवसात दाखवलेली नाही. सरकार दहीहंडीत गोविंदा, गणपतीमध्ये डॉल्बीबाबत जी तत्परता दाखवली ती शेतकऱ्यांबाबत का दाखवत नाही, असा सवाल करत महाराष्ट्रात ऊस वगळता एकही पीक अतिवृष्टीमुळे शिल्लक राहिले नाही. मात्र कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे बोलतात, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. तसेच सध्याची परिस्थिती ओल्या दुष्काळाच्या निकषात बसत नसेल तर निकष बदला. वैश्विक तापमान वाढीमुळे सगळे ऋतू बदललेले आहेत. त्यामुळे बदलत्या काळाप्रमाणे तुम्ही तुमची धोरण बदलली नाहीत तर उपयोग काय? मात्र हे सर्व निकष, धोरण हे मदत देण्यासाठी आहे की टाळण्यासाठी हे सरकारने सांगावे, अशी विचारणा राजू शेट्टी यांनी केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: raju shetti clears stand over maha vikas aghadi alliance or balasahebanchi shiv sena and bjp yuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.