Raju Shetti: “राज्य चालवताय का हजामत करताय?”; राजू शेट्टींची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:56 PM2022-04-13T23:56:38+5:302022-04-13T23:57:57+5:30

Raju Shetti: शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळावी, यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

raju shetti criticized maha vikas aghadi thackeray govt over electricity supply to farmers and other issues | Raju Shetti: “राज्य चालवताय का हजामत करताय?”; राजू शेट्टींची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

Raju Shetti: “राज्य चालवताय का हजामत करताय?”; राजू शेट्टींची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

Next

सांगली:शेतकरी प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या अनेक मुद्द्यांवरून राजू शेट्टी गेल्या काही दिवसांपासून चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. तसेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णयही राजू शेट्टी यांनी घेतला आहे. यातच आता राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत, राज्य चालवताय का हजामत करताय, असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. 

सांगलीच्या भिलवडी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळावी, यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्याबाबत १ मे रोजी गावागावात होणाऱ्या ग्रामसभेत शेतकर्‍यांना २४ तास वीज मिळण्याबाबतचा ठरावही घेतला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 

राज्य सरकारच्या विरोधात उतरण्याची तयारी

राज्य सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनात उतरण्याची तयारी राजू शेट्टी यांनी सुरू केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना केवळ दिवसा वा रात्री नाही, तर २४ तास वीज मिळावी, या मागणीसाठी आपण आग्रही असल्याचे राजू शेट्टी नमूद केले. राज्यात दुधाचे एक रकमी पैसे मिळतात,कापसाचे पैसे एक रकमी मिळतात, मग उसाचे पैसे एकरकमी का मिळत नाहीत? म्हणून आम्ही एकरकमी एफआरपीवर ठाम आहोत, असे राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले. 

मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक

राज्यात उन्हाळी सोयाबीन पिकाच्या बियाणांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा समोर आले आहे. हे राज्य सरकार आणि कृषी विभागाचे अपयश आहे. शेतकऱ्यांना महाबीजकडून बियाणे देण्यात आले. महाबीजवर नियंत्रण हे कृषी मंत्रालयाचे असते आणि कृषी मंत्रालय हे राज्य सरकार चालवते. सोयाबीन बियाणांमध्ये फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी राज्यातून पुढे येत आहेत. मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक झालेली आहे. एका बाजूला ही फसवणूक आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. रात्रीच्या वेळेस साप चावून अनेक शेतकरी मृत पावलेले आहेत. त्यामुळे चेष्टा चालवली आहे का? तुम्ही राज्य चालवता की, हजामत करता? असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. 

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळालीच पाहिजे. एका बाजूला सर्वसामान्यांना २४ तास वीज,मात्र शेतकऱ्यांना रात्री, हा अन्याय आहे. राज्यातून ज्या धरणातून वीज निर्मिती केली जाते, त्या धरणातील जमिनी या शेतकऱ्यांचे आहेत. मात्र त्याच शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. संविधानानुसार, ऊर्जा संपत्तीवर सर्वांचा सामना हक्क आहे. पण इतरांना दिवसा वीज व शेतकऱ्यांना रात्रीचे वीज हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: raju shetti criticized maha vikas aghadi thackeray govt over electricity supply to farmers and other issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.