Raju Shetti : "आता फक्त स्वस्त आहे मरण, त्याला केव्हा लावता जीएसटी?"; राजू शेट्टींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 03:03 PM2022-07-19T15:03:27+5:302022-07-19T15:23:32+5:30

Raju Shetti And Modi Government : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

Raju Shetti Slams Modi Government Over GST | Raju Shetti : "आता फक्त स्वस्त आहे मरण, त्याला केव्हा लावता जीएसटी?"; राजू शेट्टींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Raju Shetti : "आता फक्त स्वस्त आहे मरण, त्याला केव्हा लावता जीएसटी?"; राजू शेट्टींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई - अनेक गरजेच्या वस्तू महाग झाल्या आहेत. गेल्या महिन्यात जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक खाद्यपदार्थ व वस्तूंवरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी आता होत आहे. यामुळे दही, लस्सी, तांदूळ, पीठ, पनीर, मासे यासह अनेक जीवनावश्यक वस्तू महाग झाल्यात. रुग्णालयाने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खोली उपलब्ध करून दिल्यास त्या खोलीवर ५ टक्के दराने जीएसटी यापुढे द्यावा लागेल. याच दरम्यान यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केला आहे. 

"आता फक्त स्वस्त आहे मरण, त्याला केव्हा लावता जीएसटी?" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली आहे. "पेट्रोल, डिझेल, गॅस महाग, शिक्षण आवाक्याबाहेर, दवाखाना परडवत नाही, तेल, मीठ, चटणी, तांदूळ, डाळ, दही साखर, वह्या पुस्तके साऱ्यांनाच जीएसटी... आता स्वस्त आहे फक्त मरण त्याला केव्हा लावता जीएसटी?" असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. 

१ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या हॉटेलच्या खोल्यांवर जीएसटी नव्हता, आता यावर १२ टक्के जीएसटी आहे. दही, लस्सी आणि बटर मिल्कवर ५ टक्के जीएसटी लागेल. ब्रँड नसलेले प्री-पॅकेज केलेले आणि प्री-लेबल केलेले पीठ आणि डाळींवरही ५ टक्के जीएसटी लावला जाईल.

ब्लेड, कात्री, पेन्सिल शार्पनर, नकाशे, चमचे, काटे चमचे, स्किमर, केक सर्व्हिसवर जीएसटी वाढवला आहे. त्यावर १८% दराने जीएसटी वसूल केला जाईल. एवढेच नाही तर एलईडी बल्बवर १८% जीएसटी आकारण्यात येईल. गोदामात ड्रायफ्रूट्स, मसाले, गूळ, कापूस, चहा, कॉफी इत्यादी ठेवणेही महाग होणार आहेत. त्यांच्यावर १२ टक्के दराने जीएसटी आकारला जाईल.
 

Web Title: Raju Shetti Slams Modi Government Over GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.