Mucormycosis: “ठाकरे सरकारच्या ‘म्युकरमायकोसिस’बाबत केवळ घोषणा, अजून किती बळी घेणार?”

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 10:21 PM2021-05-14T22:21:52+5:302021-05-14T22:24:21+5:30

Mucormycosis: कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीच्या आजाराचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे.

raju shetty criticised thackeray govt on announcement about mucormycosis | Mucormycosis: “ठाकरे सरकारच्या ‘म्युकरमायकोसिस’बाबत केवळ घोषणा, अजून किती बळी घेणार?”

Mucormycosis: “ठाकरे सरकारच्या ‘म्युकरमायकोसिस’बाबत केवळ घोषणा, अजून किती बळी घेणार?”

Next
ठळक मुद्देठाकरे सरकारच्या ‘म्युकरमायकोसिस’बाबत केवळ घोषणायाच मुद्द्यावरून आता ठाकरे सरकारवर टीका

मुंबई: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असली, तरी कोरोना मृत्यूचे वाढणारे प्रमाण चिंताजनक आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा तुडवडा अद्यापही जाणवत आहे. त्याचबरोबर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीच्या आजाराचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळाले असून, याच मुद्द्यावरून आता ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. (raju shetty criticised thackeray govt on announcement about mucormycosis)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजाराचे दीड हजारांहून अधिक रुग्ण असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मात्र, यासंदर्भात अद्याप शासन आदेश निघालेला नाही. यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

ठाकरे सरकारच्या ‘म्युकरमायकोसिस’बाबत केवळ घोषणा

कोरोनानंतर होणाऱ्या Mucormycosis या आजारावरील उपचार जनआरोग्य योजने अंतर्गत होईल, अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी करून चार दिवस झाले. अद्याप शासन निर्णय झालेला नाही. खासगी दवाखाने उपचारासाठी १० लाख पॅकेजची मागणी करतात. Ambisome या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे, काळा बाजार होतोय. सर्वसामान्य, गोरगरीब आपला जीव गमावतायत. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या २ दिवसात ४ रुग्णांनी जीव गमावला, ५ रुग्ण अत्यावस्थ आहेत. शासन निर्णय होणार कधी? अजून किती लोकांचा बळी घेणार आहात?, अशी विचारणा राजू शेट्टी यांनी केली आहे. यासंदर्भात दोन ट्विट करत राजू शेट्टींनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. 

पॉझिटिव्ह बातमी! कॅन्सर झालेल्या ३ वर्षाच्या चिमुकल्याची कोरोनावर मात; रुग्णालयात जल्लोष

“काँग्रेसच्याही खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांना पंतप्रधान मोदी NPA वाटणे स्वाभाविक”

एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा कोटा वाढवून द्यावा

महाराष्ट्रातील काळ्या बुरशीच्या आजाराची रुग्णसंख्या वाढत असून, एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा कोटा वाढवून द्यावा. तसेच या इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे आदेश देण्यात यावेत. एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची किंमत ६ हजार रुपयांच्या आसपास आहे. एका रुग्णाला २०-२० इंजेक्शन्स द्यावी लागत आहेत. अशावेळी इंजेक्शन्सची किंमत कमी करावी, अशी आग्रही मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करत काळ्या बुरशीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय करायला हवे, त्यासाठी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे राजेश टोपे यांनी अलीकडेच नमूद केले होते. 
 

Web Title: raju shetty criticised thackeray govt on announcement about mucormycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.