राजू शेट्टी, सदाभाऊ खोत धंदेवाईक निघाले; शंकरअण्णा धोंडगे यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 12:02 AM2017-09-24T00:02:41+5:302017-09-24T00:03:51+5:30
‘राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, या दोघांच्याही छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला मी लावला. ही आमचीच लेकरे असली तरी ती धंदेवाईकपणे वागू लागली आहेत,’ अशी टीका माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली.
सातारा : ‘राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, या दोघांच्याही छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला मी लावला. ही आमचीच लेकरे असली तरी ती धंदेवाईकपणे वागू लागली आहेत,’ अशी टीका माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली.
आमचे दोन कार्यकर्ते शेतक-यांनी निवडून दिले. मात्र, त्यांनीच धंदेवाईक राजकारण सुरू केले. तुमचे भांडण दीड जिल्ह्यापुरते आहे. अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही वेठीस का धरत आहात? शेतकरी धर्मसंकटात आहे. त्याला दिलासा देण्यासाठी त्यागाची भूमिका घ्या,’ असेही धोंडगे यांनी सांगितले.
‘भारत हा देश कृषीवर अवलंबून आहे. मात्र हेच क्षेत्र सध्या अडचणीत आहे. शेतक-यांना देशोधडीला लावण्याचा डाव भाजपा सरकारने आखला आहे. या सरकारने केनियासह इतर देशांमध्ये जमीन भाड्याने घेऊन तिथला शेतमाल भारतात आणला जात आहे. मागणी नसतानाही मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आयात केली जात असताना शेतकºयांना हमीभाव देण्यास मात्र टाळाटाळ केली जाते, असा आरोपही धोंडगे यांनी केला.