राजू शेट्टींनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रशिक्षण द्यावे : सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 04:43 PM2019-08-05T16:43:53+5:302019-08-05T16:47:20+5:30
कृषी राज्यमंत्री खोत सोलापूर दौºयावर; जनआंदोलन नसून ते मनआंदोलन, खोत यांचा खोचक टोला
पंढरपूर : येणाºया विधानसभेच्या निवडणुका ईव्हीएम मशीनला विरोध करण्यासाठी विरोधी गटाचे सर्वजण एकत्र येऊन आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन जनआंदोलन नसून, ते मनआंदोलन आहे. यामुळे या आंदोलनात किती लोक सहभागी होतात, याची मला उत्सुकता लागली असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे पंढरपुरातील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सदाभाऊ खोत म्हणाले, राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांना आंदोलन नेमके कोणत्या विषयासाठी करायचे हेच कळेना झाले आहे. आता त्यांच्या आंदोलनामध्ये राजू शेट्टी सहभागी झाले आहेत. राजू शेट्टी यांना आंदोलनाचा चांगला अनुभव आहे. त्यांनी पुढील ५ वर्षे राष्टÑवादी व काँग्रेसच्या नेत्यांना प्रशिक्षण द्यावे, असा सल्लादेखील सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला आहे.
१५ दिवसांत जागा वाटपावर चर्चा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे व बाकी सर्व घटक पक्षांचे नेते १५ दिवसांमध्ये एकत्र बसणार आहेत. त्या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, या विषयावर चर्चा होणार आहे. घटक पक्षांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे जाणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले़