"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद कंत्राटी करून टाका, ते तरी कायमचं कशाला? - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 04:32 PM2023-10-12T16:32:01+5:302023-10-12T16:39:27+5:30

Raju Shetty on Contractual Police recruitment: "सरकारला सगळ्यातूनच अंग काढून घ्यायचं असेल तर जनतेने तुम्हाला कर का द्यायचा?"

Raju Shetty trolls Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar says Make Chief Minister, Deputy Chief Minister post on contract basis | "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद कंत्राटी करून टाका, ते तरी कायमचं कशाला? - राजू शेट्टी

"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद कंत्राटी करून टाका, ते तरी कायमचं कशाला? - राजू शेट्टी

Raju Shetty on Contractual Police recruitment: देशात अनेक सरकारी सेवांमध्ये कंत्राटीकरण आणि खासगीकरण होत असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. याविरोधात देशातील विविध विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहेच. याच दरम्यान आता राज्यातही कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती केली जाणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारने राज्यात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कंत्राटी पद्धतीने ३ हजार पोलिसांची भरती करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. या मुद्द्यावरून जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदही कंत्राटी करा, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

"एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत आहे आणि दुसरीकडे सरकार कंत्राटी भरती करत आहे. मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तरी कायमचं कशाला ठेवता? तेदेखील कंत्राटी करून टाका. तसेही दुसऱ्या पक्षातून उसने घेतलेले लोक आहेतच. सरकारच्या अशा धोरणांमुळे लोकांचे किती नुकसान होत आहे याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. शाळा चालवायला द्यायच्या, कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरायचे, पोलीस कंत्राटी ठेवायचे मग सरकारदेखील कंत्राटी पद्धतीने ठेवले तर काय वाइट आहे," असा खोचक टोला राजू शेट्टींनी सांगलीत बोलताना लगावला.

"जनता तुम्हाला कर का द्यावा? लोकांच्या मुलभूत गरजांमध्ये अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या गोष्टी येतात. या गरजा तळगाळातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं ही सरकारची जबाबदारी आहे. यासाठीच सामान्य माणूस प्रामाणिकपणे कर भरतो. पण सरकारच सगळ्या गोष्टींमधून अंग काढून घेत असेल तर जनतेने तुम्हाला कर का द्यायचा?", असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कंत्राटी भरतीमधील नियम काय?

पोलीस भरतीतील ही ३ हजार पदे ११ महिन्यांसाठी असणार आहेत. मुंबईत ही भरती करण्यास गृह विभागाने मंजूरी दिली आहे. यासाठी ३० कोटी रुपये राखीव ठेवण्यात येणार आहेत. राज्य सुरक्षा महामंडळातर्फे कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे.

Web Title: Raju Shetty trolls Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar says Make Chief Minister, Deputy Chief Minister post on contract basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.