कर्जमुक्ती, हमीभावासाठी संसदेत विधेयक मांडणार - राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:15 AM2018-04-30T05:15:17+5:302018-04-30T05:15:17+5:30
हाराष्ट्र दिनानिमित्ताने शेतक-यांनी गावागावातून शेतक-यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलाविण्याचा ठराव करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केले आहे.
नाशिक : शेतकऱ्यांना कायदेशीर मार्गाने कर्जमुक्ती आणि हमीभाव मिळवून देण्यासाठी संसदेत दोन स्वतंत्र विधेयक मांडणार असून त्यासाठी महाराष्ट्र दिनानिमित्ताने शेतक-यांनी गावागावातून शेतक-यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलाविण्याचा ठराव करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केले आहे.
शेट्टी म्हणाले, शेतकºयांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील असून, देशात दिवसेंदिवस शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. १ मे पासून मराठवाडा व पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमधून शेतकरी सन्मान यात्रा काढली जाईल. मंत्रालयात प्रवेश करून आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात विखरण गावातून सन्मान यात्रेला प्रारंभ होणार आहे. जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, वाशिम, नांदेड, परभणी, जालना, लातूर असा प्रवास करून उस्मानाबाद जिल्ह्यातील शिरढोण येथे शेतकरी सन्मान यात्रेचा ९ मे रोजी समारोप होईल.