राजुरी स्टीलला २५ वर्षे पूर्ण

By Admin | Published: April 27, 2016 05:10 AM2016-04-27T05:10:48+5:302016-04-27T05:10:48+5:30

स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्या पिळदार सळईचे उत्पादन करीत असत.

Rajuri Steel completed 25 years | राजुरी स्टीलला २५ वर्षे पूर्ण

राजुरी स्टीलला २५ वर्षे पूर्ण

googlenewsNext

जालना : स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्या पिळदार सळईचे उत्पादन करीत असत. मात्र, त्याचा दर्जा चांगला नसल्याने त्याचे आयुष्य जास्त नव्हते. काही कंपन्यांनी टीएमटी सळई उत्पादनासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणले. मात्र, त्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. या कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढत १९९१ मध्ये स्थापन झालेल्या राजुरी स्टीलने २००३ मध्ये जर्मन तंत्रज्ञानावर आधारित दर्जेदार व गुणवत्तापूर्ण टीएमटी सळईचे उत्पादन करुन बांधकाम क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे.
राजुरी स्टीलने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून, स्टील बाजारात गुणात्मक आणि दर्जात्मक उत्पादनामुळे आपला वेगळा ठसा उमटवला आहे. २००३ पर्यंत टीएमटी प्रकारच्या सळई उत्पादनात काही विशिष्ट कंपन्यांची मक्तेदारी होती. तसेच या उत्पादनांचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. नेमकी हीच बाब हेरुन राजुरी स्टीलने अद्ययावत जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ५०० टीएमटी सळईचे उत्पादन सुरू केले आणि हीच स्टील बाजारात ‘राजुरी’ने घडवून आणलेली क्रांती होय. यानंतर राज्यासह देशातील अनेक भागात टीएमटी सळईचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. या उत्पादनामुळे बांधकाम क्षेत्राला भरारी येऊन सर्वसामान्यांचे
घराचे स्वप्न आकार घेऊ
शकले. हेच राजुरीच्या यशाचे गमक आहे.
‘राजुरी’ सळई उत्पादनासह स्पांज आर्यन निर्मिती करीत आहे. त्याचबरोबर कंपनीने अद्ययावत प्रयोगशाळा उभारून नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे अधिकाधिक दर्जेदार सळईचे उत्पादन सुरू केले आहे. ज्यामुळे बांधकाम क्षेत्रात राजुरीने आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.
प्रयोगशाळेमुळे उत्पादनाचे बारकाईने संशोधन करून ते अधिकाधिक चांगले कसे होईल, यासाठी कंपनी व्यवस्थापन कसोशीने प्रयत्न करत आहे. कंपनीने चंद्रपूरमध्येही उत्पादन सुरू केले आहे.
याशिवाय उत्पादनाचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी राज्यभर मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती व माहिती दिली जात आहे. यात आतापर्यंत जवळपास १५०० मिस्त्री मेळावे, सुमारे २०० अभियंत्यांचे मेळावे घेऊन उत्कृष्ट स्टीलबाबत जनजागृती करण्यात आली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या उद्योगाला नवी दिशा दिली. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे ५ ते ७ हजार लोकांना रोजगार दिला. सुरुवातीच्या काळात पिळदार सळई केली जात असे. पण राजुरीने जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करुन ५०० टीएमटीची क्षमता असलेल्या सळईची निर्मिती सुरू केल्याने लोखंडाची बचत होऊन बांधकामाचा दर्जा सुधारला
आहे.
>सामाजिक कार्यातही अग्रेसर
४केवळ व्यवसाय वा उद्योगच न करता सामाजिक बांधिलकीही जपली जावी, या भावनेतून राजुरी स्टीलच्या वतीने सात वर्षापूर्वी स्त्री भ्रूण हत्या विरोधात राज्यभरात पथनाट्य, भित्तीपत्रके, समुदेशन याद्वारे जनजागृती करण्यात आली.या परिणामस्वरूपी आज राज्यातील विविध जिल्ह्यात स्त्री दर जन्मदाराचा वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येते.

Web Title: Rajuri Steel completed 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.