वर्षावर बॅग घेऊनच पोहोचा; सेना आमदारांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 05:27 AM2022-06-05T05:27:11+5:302022-06-05T06:55:40+5:30
Rajya Sabha election 2022 : ६ तारखेला सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचा असा निरोप या आमदारांना देण्यात आला आहे.
मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व शिवसेना समर्थित अपक्ष आमदारांना हॉटेलवर मुक्कामी ठेवण्यात येणार आहे.
६ तारखेला सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचा असा निरोप या आमदारांना देण्यात आला आहे. या आमदारांना कोणत्या हॉटेलमध्ये थांबविणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आधी त्यांना मंत्रालयाजवळील ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवणार अशी चर्चा होती.
याच हॉटेलमध्ये भाजप आपल्या आमदारांना ठेवणार अशी माहिती आल्यानंतर शिवसेना आमदारांसाठी अन्य हॉटेलचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे. शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना एकत्रित ठेवले जाऊ शकते. यामुळे सर्व आमदारांवर नेत्यांची नजर राहणार आहे.