“शरद पवार मोठे नेते, पण राज्यसभेच्या जागेचा दावा सोडणार नाही”; उद्धवसेनेचे नेते थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 17:03 IST2026-02-27T16:55:32+5:302026-02-27T17:03:18+5:30

Rajya Sabha Election 2026: आमचे संख्याबळ अधिक आहे. गेल्यावेळी आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली होती. पण आता कुठल्याही परिस्थितीत आमचा दावा सोडणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

rajya sabha election 2026 uddhav thackeray group varun sardesai said sharad pawar is a great leader but he will not give up his claim to rajya sabha seat | “शरद पवार मोठे नेते, पण राज्यसभेच्या जागेचा दावा सोडणार नाही”; उद्धवसेनेचे नेते थेटच बोलले

“शरद पवार मोठे नेते, पण राज्यसभेच्या जागेचा दावा सोडणार नाही”; उद्धवसेनेचे नेते थेटच बोलले

Rajya Sabha Election 2026: राज्यातून निवडून देण्याच्या राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र या एका जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असून, त्यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) च्या नेत्यांची बैठक पार पडली. मात्र या बैठकीतूनही तोडगा निघालेला नाही. यातच उद्धवसेनेच्या नेत्यांनी काही झाले तरी राज्यसभेच्या जागेवरील दावा सोडणार नसल्याचे म्हटले आहे. 

महाविकास आघाडीत सर्वात जास्त आमदार उद्धवसेनेचे आहेत. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी, असा आग्रह उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत याबाबत एकमत झालेले नाही. त्यामुळे ही जागा कोणाला सुटणार याकडे लक्ष लागले आहे. यानंतर आता उद्धवसेनेचे आमदार वरूण सरदेसाई यांनीही प्रतिक्रिया देताना राज्यसभेच्या जागेवरील दावा सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. 

शरद पवार मोठे नेते, पण राज्यसभेच्या जागेचा दावा सोडणार नाही

राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नाही. आमच्या पक्षातील आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले मत मांडले आहे. सन २०२० साली आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या उमेदवारीवेळी मदत केली होती. आता संख्याबळानुसार आमचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे जर आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाईल. शरद पवार हे मोठे नेते आहेत, शरद पवार उमेदवार म्हणून इच्छुक असतील आणि त्यांच्या नेत्यांकडून तसेच महाविकास आघाडीकडून तसे बोलले गेले तरीही आम्ही आमचा राज्यसभेच्या जागेसाठीचा दावा सोडणार नाही, असे वरूण सरदेसाईंनी म्हटले आहे.

दरम्यान, शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार असून, त्यांच्यासाठी ही जागा मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार) च्या नेत्यांनी या बैठकीत केली. त्यावर शरद पवारांनी स्वतः ही इच्छा प्रदर्शित केली आहे का? असे काँग्रेसकडून विचारण्यात आले. मात्र स्वतः शरद पवार याबाबत अधिकृत काही बोलले नाहीत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी ती इच्छा व्यक्त केल्याचे पक्षातील नेत्यांनी सांगितले. स्वतः शरद पवार यांनी याबाबत भूमिका न मांडल्याने काँग्रेसने या जागेवरील दावा सोडलेला नाही. 

 

Web Title : राज्यसभा सीट पर अड़ी उद्धव सेना, पवार की इच्छा पर भी नहीं छोड़ेगी दावा।

Web Summary : उद्धव सेना ने राज्यसभा सीट छोड़ने से इनकार किया, भले ही शरद पवार इच्छुक हों। उन्होंने अधिक संख्या का हवाला दिया और एनसीपी को दिए पिछले समर्थन को याद किया। कांग्रेस ने भी पवार की सीधी रुचि पर सवाल उठाते हुए सीट पर दावा किया, जिससे एमवीए में तनाव है।

Web Title : Uddhav Sena adamant on Rajya Sabha seat, even if Pawar wants it.

Web Summary : Uddhav Sena refuses to cede Rajya Sabha seat, despite Sharad Pawar's potential interest. They cite larger numbers, recalling past support for NCP. Congress also contests the seat, questioning Pawar's direct interest, creating MVA tension.