...तर माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकते; पक्ष मला 6 वर्षांसाठी निलंबित करू शकतो - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 11:39 PM2022-06-10T23:39:27+5:302022-06-11T00:07:56+5:30

आव्हाड म्हणाले, मत दिल्यानंतर ते पक्षाच्या एजंटला दाखवणे आवश्यक असते, तसे केले नाही तर पक्षाचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, पक्ष कारवाई करू शकतो. दुर्दैवाने संपूर्ण महाराष्ट्रला वेठीस धरून, मोठा संभ्रम निर्माण करून, गैरसमज पसरत असतील तर, त्याचा स्पष्ट खुलासा करण्यासाठी मी येथे आलो आहे.

Rajya Sabha Election After the BJP objected Jitendra Awhad says then my political life will be ruined The party will suspend me for 6 years | ...तर माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकते; पक्ष मला 6 वर्षांसाठी निलंबित करू शकतो - जितेंद्र आव्हाड

...तर माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकते; पक्ष मला 6 वर्षांसाठी निलंबित करू शकतो - जितेंद्र आव्हाड

Next

मुंबई –  आज झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी (Rajya sabha election) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नियमबाह्य मतदान केल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. यासंदर्भातील भाजप आमदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर पत्र देत, आव्हाडांचे मत बाद करण्यात यावे, अशी मागणीही केली आहे. यानंतर आता, जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. आपण राज्यसभेसाठी मतदान (Voting for Rajya sabha election) करताना कोणतीही चूक केली नाही. मतदान करताना जी प्रक्रिया करावी लागते, तीच प्रक्रिया आपण केली आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

आव्हाड म्हणाले, मत दिल्यानंतर ते पक्षाच्या एजंटला दाखवणे आवश्यक असते, तसे केले नाही तर पक्षाचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, पक्ष कारवाई करू शकतो. दुर्दैवाने संपूर्ण महाराष्ट्रला वेठीस धरून, मोठा संभ्रम निर्माण करून, गैरसमज पसरत असतील तर, त्याचा स्पष्ट खुलासा करण्यासाठी मी येथे आलो आहे.
  
काय म्हणाले आव्हाड, कसं केलं मतदान? -
आव्हाड म्हणाले, "मी साधारणपणे बारा साडेबाराच्या सुमारास विधानसभेत पोहोचलो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो. तेथून मला जे सांगण्यात आले. ते ऐकूण मी मतदानासाठी गेलो. मतदान केल्यानंतर मी ते माझ्या पक्षांच्या एजंटना दाखवले. तेव्हा कागद माझ्या छातीवर होता, कॅमेरा माझ्या मागे होता. त्यावेळी मी थोडा हसलो. त्याला वेगळे कारण होते. यानंतर मतपत्रिका बंद करून मी बाहेर आलो, मतदान पेटीकडे गोलो, मतदान टाकले आणि बाहेर निघून गेलो. 

यानंतर मी गेटवर आलो. तोवर माझ्यावर कसल्याही प्रकारचे ऑब्जेक्शन घेण्यात आलेले नव्हते. यानंतर मला माध्यमांकडून समजले, की माझ्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आले आहे. मात्र, यासंपूर्ण प्रक्रियेत माझ्याकडून काही चूक झाल्याचे मला तरी वाटत नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

...तर माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकते -
उगाच महाराष्ट्रासमोर असे जायला नको, की आम्ही काही वेगळे केले आहे, काही चुका केल्या आहेत, अजिबात नाही. काही कारण नसताना काहीतरी रडीचे डाव टाकत आहेत. माझ्या मते, माझ्याकडून कसलीही चूक झालेली नाही. माझे मतदान ज्या व्यक्तीला दाखवायचे असते, नियमाने त्यांना मतदान दाखवले. ते न दाखवल्यास माझा पक्ष मला सहा वर्षांसाठी निंलंबित करू शकतो. माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकते. मी माझी क्रिया केली. माझ्या माणसाला माझे मतदान दाखवले. पण आता हा संभ्रम निर्माण केला जात आहे. गैरसमज पसरत असतील, तर त्याचा खुलासा करायला मी आलो आहे, असेही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. 
 

Web Title: Rajya Sabha Election After the BJP objected Jitendra Awhad says then my political life will be ruined The party will suspend me for 6 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.