Rajya Sabha Election: राज्यसभेच्या मतदानापूर्वी भाजपासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी; देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 04:07 PM2022-06-09T16:07:48+5:302022-06-09T16:08:24+5:30

राज्यसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या आमदारांना हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

Rajya Sabha Election: 'Positive' news for BJP for Rajya Sabha polls; Devendra Fadnavis corona free | Rajya Sabha Election: राज्यसभेच्या मतदानापूर्वी भाजपासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी; देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या मतदानापूर्वी भाजपासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी; देवेंद्र फडणवीस मैदानात उतरणार

googlenewsNext

मुंबई - राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उद्या म्हणजे १० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाने ३, शिवसेनेने २ तर काँग्रेस राष्ट्रवादीने प्रत्येकी १ उमेदवार रिंगणात उतरवला आहे. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपा यांच्यात थेट लढत आहे. या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपाचे धनंजय महाडिक यांच्यात सामना होईल. या निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे. 

त्यातच अलीकडेच भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण झाल्याने निवडणुकीच्या मैदानात भाजपा मागे पडल्याचं चित्र दिसून येते. फडणवीस यांनी ऑनलाईन बैठका, फोन यांच्या सहाय्याने अपक्ष आणि घटक पक्षाच्या आमदारांशी संवाद साधत होते. परंतु निवडणुकीत फडणवीसांना मतदान करता येईल का? हा प्रश्न मोठा होता. तत्पूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीला काही तास शिल्लक असताना भाजपासाठी पॉझिटिव्ह बातमी आली आहे. 

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे फडणवीस हे कोरोनामुक्त झाले आहेत. आता राज्यसभेच्या मतदानापूर्वी फडणवीस भेटीगाठी, बैठका घेण्यात व्यस्त झाले आहेत. त्याचसोबत निवडणुकीत त्यांना मतदानही करता येणार आहे. आज भाजपा आमदारांची हॉटेल ताज येथे बैठक होणार आहे. या बैठकीला फडणवीस हजर राहतील असंही सांगितले जात आहे. या बैठकीत मतदान कसे करायचे याची माहिती सर्व आमदारांना दिली जाणार आहे. 

मविआची धाकधूक वाढली 
राज्यसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या आमदारांना हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. या निवडणुकीत आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी अपक्ष आणि घटक पक्षांच्या आमदारांची मदत लागणार आहे. परंतु घटक पक्षाने मविआ सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यात बहुजन विकास आघाडीकडे ३ मते आहेत. त्यांनी आम्ही १० तारखेलाच निर्णय घेऊ अशी भूमिका घेतली आहे. तर बच्चू कडू यांनीही मविआ आमदारांच्या बैठकीला दांडी मारली होती. त्याचसोबत आता राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी द्यावी असा अर्ज कोर्टात केला होता. परंतु त्यांनाही मतदानाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे पुढील २४ तास मविआची धाकधूक वाढली आहे. 

Web Title: Rajya Sabha Election: 'Positive' news for BJP for Rajya Sabha polls; Devendra Fadnavis corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.