Rajya Sabha Election: मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेनेची पळापळ, एमआयएमच्या आमदारालाही घातली गळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 06:23 PM2022-06-06T18:23:38+5:302022-06-06T18:25:54+5:30

Rajya Sabha Election Updates: राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवणाऱ्या शिवसेनेने मतांची जुळवाजुळव करण्यासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच शिवसेनेने मतांसाठी एमआयएमच्या आमदाराला गळ घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Rajya Sabha Election: Shiv Sena leader Dada Bhuse's request to MIM MLA for support Shiv sena Candidate in Rajya Sabha elections | Rajya Sabha Election: मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेनेची पळापळ, एमआयएमच्या आमदारालाही घातली गळ

Rajya Sabha Election: मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेनेची पळापळ, एमआयएमच्या आमदारालाही घातली गळ

googlenewsNext

मुंबई - राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्य राज्यसभेच्या ६ जागांसाठी होणारी निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने आपला अतिरिक्त उमेदवार उतरवल्याने चुरस वाढली आहे. आता आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवणाऱ्या शिवसेनेने मतांची जुळवाजुळव करण्यासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच शिवसेनेने मतांसाठी एमआयएमच्या आमदाराला गळ घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने संजय राऊत यांच्याबरोबर संजय पवार यांच्या रूपात दुसरा उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे शिवसेने आपल्या कोट्यातील पहिली ४२ मते संजय राऊत यांना देईल हे निश्चित आहे. दरम्यान उर्वरित १३ मतांसह मित्रपक्षांची काही मते आणि अपक्ष छोट्या पक्षांची मते अशी जुळवाजुळव करून आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यासाठी या आमदारांना आपल्याकडे वळवण्यास शिवसेना प्रयत्नशील आहे. दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी एमआयएमचे मालेगावमधील आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांना विनंती केली आहे. दादा भुसे यांना पाठिंब्यासाठी आपली भेट घेतली होती, अशी माहिती मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी दिली आहे.

याबाबत मामध्यमांना माहिती देताना मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी सांगितले की, राज्य सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी परवा माझी भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या राज्यसभा निवडणुकीतील दुसऱ्या उमेदवाराला मत देण्याची विनंती केली होती. मात्र आम्ही पक्षासोबत आहोत. तसेच पक्ष जो निर्णय घेईल. त्याचं आम्ही पालन करू, असं मी त्यांना सांगितलं.

राज्यसभेत कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत एमआयएमनं निर्णय घेतलेला नाही. पक्षाची आज संध्याकाळी बैठक आहे. तसेच योगायोगाने ओवोसीसुद्धा आज महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे आज पक्षाचा याबाबत निर्णय होऊ शकतो अशी माहिती मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी दिली.  

Web Title: Rajya Sabha Election: Shiv Sena leader Dada Bhuse's request to MIM MLA for support Shiv sena Candidate in Rajya Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.