"नशीब! संजय राऊत काठावर वाचले नाहीतर उलटं झालं असतं; संजय पवार निवडून आले असते" 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 04:46 PM2022-06-11T16:46:38+5:302022-06-11T16:46:59+5:30

पहिल्याच फेरीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे हा आमचा प्रयत्न होता असं छगन भुजबळांनी सांगितले.

Rajya Sabha Result: "then Sanjay Pawar would have been elected." Chhagan Bhujbal Reaction on Sanjay Raut | "नशीब! संजय राऊत काठावर वाचले नाहीतर उलटं झालं असतं; संजय पवार निवडून आले असते" 

"नशीब! संजय राऊत काठावर वाचले नाहीतर उलटं झालं असतं; संजय पवार निवडून आले असते" 

Next

नाशिक - राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले, या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंतु निवडणूक नियमांचे भंग केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे १ मत बाद झाले. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत भाजपाचे ३, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत काही अपक्षांची मते मिळवण्यात भाजपाला यश आले. 

या निकालावर छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) म्हणाले की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून यावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. दुर्दैवाने आमच्या चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. मविआला अडचण असं काही नाही. मविआनं बहुमत सिद्ध केलं तेव्हा आम्हाला १७० आमदारांचा पाठिंबा होता. शेवटचा उमेदवार ३९ मतांवर राहिला. एकूण जर बेरीज केली तर आमची संख्या १६६ च्या वर आहे. महाविकास आघाडी भक्कम आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ही निवडणूक प्रक्रिया किचकट आहे. पहिल्याच फेरीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायचे हा आमचा प्रयत्न होता. संजय राऊत यांचीच अडचण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सरकार असताना आम्ही १७० ऐवजी १८० ची बेरीज करायला पाहिजे होती. त्यात आम्ही निश्चित कमी पडलो आहोत.  पवारांच्या बोलण्याचा अर्थ आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. तिन्ही पक्षाच्या आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणावर यावेळी उफाळून आली. मविआचा कोणताही आमदार आपल्याच पक्षाचा आहे असं समजूनच काम करायला पाहिजे. तिथल्या आमदाराला तो दुखावला जाणार नाही, त्याच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही ही शिकवण आम्हाला मिळालेली आहे. एकोप्याने पुढे जावं लागेल असंही छगन भुजबळ म्हणाले. 

संजय राऊत काठावर वाचले
मविआच्या आमदारांना, जिल्ह्यातील पालकमंत्री यांना विश्वासात घेऊन काम करावं. जास्तीत जास्त लोकांना भेटलं पाहिजे. आम्ही एकमेकांच्या टांगेत टांग टाकता कामा नये. नाहीतर ऐन निवडणुकीत हे प्रश्न उफाळून येतात. तो पर्यंत कोणी बोलत नाही. मुख्यमंत्री भेटत नाही असं मी म्हणणार नाही. त्यांचे ऑपरेशन झालं आहेत. संजय राऊत यांनी मते न देणाऱ्यांची नावे घेतली ठीक आहे. आता त्यांना आपण पुढच्या कामासाठी जवळ कस करता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. संजय राऊत(Sanjay Raut) काठावर वाचले. आणखी उलट झालं असत. आमचं नशीब नाहीतर उलट झालं असत, संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहिले असते. आम्ही तर आमच्या लोकांना सगळं समजावून सांगितलं होतं. मात्र त्यातून या चुका कशा झाल्या, काय माहिती असंही भुजबळ यांनी सांगितले. 

Web Title: Rajya Sabha Result: "then Sanjay Pawar would have been elected." Chhagan Bhujbal Reaction on Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.