न शिकलेल्या महिला करतात 100 कोटींची उलाढाल, रक्षाबंधन ठरते गिफ्ट

By namdeo.kumbhar | Published: August 4, 2017 08:59 AM2017-08-04T08:59:15+5:302017-08-04T08:59:32+5:30

कुटुंबसंस्था प्रमाण मानणाऱ्या समाजात नात्यागोत्याला वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक नात्याला जोडून येणाऱ्या भावना वेगळ्या. जबाबदाऱ्या वेगळ्या.  अगदी ठरल्यासारख्या. परंपरांनी घट्ट विणल्या गेलेल्या या नात्यांपैकी एक बहीण-भावाचं नातं.

Rakshabandhan is beneficiary for illiterate Womens | न शिकलेल्या महिला करतात 100 कोटींची उलाढाल, रक्षाबंधन ठरते गिफ्ट

न शिकलेल्या महिला करतात 100 कोटींची उलाढाल, रक्षाबंधन ठरते गिफ्ट

Next

मुंबई, दि. 4 - कुटुंबसंस्था प्रमाण मानणाऱ्या समाजात नात्यागोत्याला वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक नात्याला जोडून येणाऱ्या भावना वेगळ्या. जबाबदाऱ्या वेगळ्या.  अगदी ठरल्यासारख्या. परंपरांनी घट्ट विणल्या गेलेल्या या नात्यांपैकी एक बहीण-भावाचं नातं. या नात्यासाठी भाऊबीज व रक्षाबंधन असे दोन सण साजरे होतात. येत्या सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे घरोघरी आणि बाजारपेठेत माहोल तयार झाला आहे. भारतातील प्रत्येक शहरातील विविध भागात राख्यांची दुकाने थाटण्यात आली असून लहान-मोठ्यांची उत्साहाने खरेदी सुरू झाली आहे. बाजारपेठेत रक्षाबंधनानिमित्त विविध प्रकारच्या अशा आकर्षक राख्यांचे प्रकार विक्रीला आलेत. काही सामाजिक संस्थांनी राख्या तयार केल्या असून त्याची विक्री करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आकर्षक अशा राख्या तयार करणाऱ्या राजस्थानमधील (अलवर) महिला सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण त्यांचं उत्पन्न आहे एखाद्या छोट्या कंपनीला लाजवेल एवढं. तब्बल 100 कोटींचं.  
राख्या तयार करणाऱ्या या अशा एकूण दहा हजार महिला.  त्यांच शिक्षण जेमतेमच. त्यामुळे त्यांना कुठेही नोकरी मिळली नाही. आता त्या वर्षभर राख्या तयार करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताहेत. 
या महिलांनी तयार केलेल्या राख्या गाव-खेड्यापासू ते 24 देशांत विक्रीला जातात. 13 कंपन्या या महिलांकडून वर्षभर राख्या तयार करुन घेतात. या राख्यांची किंमत दोन रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत आहे. या महिलांच शिक्षण जरी जेमतेम झालं असलं तरी ऐकापेक्षा एक अशा वेगवेगळ्या डिझायनच्या राख्या तयार करतात, त्यामुळे बाजारांत या राख्यांची मागणी आधीक प्रमाणात आहे. 
पूर्वी लहान मुलांसाठी स्पंजचा वापर करून राख्या तयार केल्या जात. मात्र, त्या पद्धतीच्या राख्यांचे प्रमाण कमी झाले आहे. रेशीम धाग्यांचे महत्त्व पूर्वी होते आणि पुढेही राहणार आहे. राख्यांमध्ये वेगवेगळे प्रकार उपलब्ध असले तरी यावेळी आम्ही खास चूडा राखी डिजाइन केली आहे. याशिवाय लहान मुलांसाठी भिंतीवर चढणारा स्पायडरमॅन, मिकीमाऊस, डोनाल्ड डक, स्टोन राखी, डिस्को लाईट, जु जु वंडरबॉय, टेडी बेअर यासारख्या आकर्षक राख्या तयार केल्या आहेत, असे एका महिलेनं सांगितले. 
दुसऱ्या एका महिलेनं सांगितले की, अधिक काळ हातात राखी बांधून ठेवत असल्यास आपण रेशमाच्या जागी काळा किंवा सुती धाग्याचा वापर करणे आवश्यक असते. त्यासाठी आम्ही वेगळ्या डिझायनच्य राख्या तयार केल्या. काही कुटुंबात राखी तीन दिवसानंतर सोडली जाते तर काही कुटुंबात दसर्‍याच्या दिवशी सोडतात. अशावेळी सुती धाग्याने तयार केलेली राखी दीर्घकाळ टिकू शकते.
एकमेकांना जोडणारा असा हा रक्षाबंधनाचा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. राखीचा धागा हा देखील नुसताच दोरा नसून ते स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लीत होते. असेही एका महिलेनं सांगितले. 

महाराष्ट्रातील मेळघाटातही तयार होतात राख्या - 
मेळघाट म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो कुपोषणाचा प्रश्न. आदीवासी प्रदेश. पण गेल्या पाच वर्षांत या मेळघाटने बांबूपासून बनवलेल्या राख्यांची मेट्रो शहरांला ओळख करून दिली आहे. बांबूपासून तयार केलेल्या या राख्यांमुळे अनेक आदिवासी बांधवांच्या हाती काम आले आहे. जळगावच्या समर्पण संस्था संचलित पर्यावरण शाळा अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात कार्य करीत आहेत.  
मेळघाटातील लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रातर्फे कोरकू, गोंड आदिवासी यांच्यासह पारंपरिक कारागीर असलेल्या बुरूड समाजाच्या लोकांचाही या राखी प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. बांबू, नैसर्गिक रंग, मणी इत्यादी साधनांचा उपयोग करून या इको-फ्रेण्डली राख्या तयार केल्या आहेत.
केवळ राख्याच नव्हे तर ग्रीटिंग, फळांच्या टोपल्या, इतर वस्तू, की-चेन अशा विविध प्रकारच्या बांबूच्या 150 वस्तू बनवल्या जातात. गेल्या वर्षी सुमारे 50 हजार बांबू राख्या तयार करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी मुंबईमध्ये मेळघाटातील पाच हजार सृष्टीबंध राख्या विकल्या गेल्या. यंदा हा आकडा दहा हजारांचा पल्ला गाठेल, असा अंदाज आहे.

Web Title: Rakshabandhan is beneficiary for illiterate Womens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.