रक्षाबंधन - जळगावात मायेच्या धाग्याने भारावले कैद्यी व रुग्ण

By admin | Published: August 18, 2016 06:42 PM2016-08-18T18:42:52+5:302016-08-18T18:42:52+5:30

महाविद्यालयीन विद्यार्थिंनींसह शहरातील महिलांनी पुढाकार घेऊन जिल्हा कारागृह व जिल्हा रुग्णालयात रक्षाबंधन सण साजरा केला.

Rakshabandhan - The prisoner and the patient who is filled with purple cloth in Jalgaon | रक्षाबंधन - जळगावात मायेच्या धाग्याने भारावले कैद्यी व रुग्ण

रक्षाबंधन - जळगावात मायेच्या धाग्याने भारावले कैद्यी व रुग्ण

Next

रक्षाबंधन : कारागृह व जिल्हा रुग्णालयात रक्षाबंधन
जळगाव : वर्षानुवर्षे कारागृहात शिक्षा भोगणारे कैदी असो की रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार घेणारे रुग्ण असो, त्यांचा हात राखी विना सुना राहू नये म्हणून जळगावात महाविद्यालयीन विद्यार्थिंनींसह शहरातील महिलांनी पुढाकार घेऊन जिल्हा कारागृह व जिल्हा रुग्णालयात रक्षाबंधन सण साजरा केला. या बहिणींच्या मायेच्या धाग्याने कैदी व रुग्णही भारावून गेले.

जिल्हा कारागृह
‘जळगाव फर्स्ट’ या डॉ.राधेश्याम चौधरी यांनी सुरू केलेल्या सामाजिक अभियानाच्या माध्यमातून शहरातील बभिनींकडून जिल्हा कारागृहातील कैद्यांना राखी बांधण्यात येऊन रक्षाबंधन साजरा करण्यात आले. कारागृह अधीक्षक डी. टी. डाबेराव, डॉ. राधेश्याम चौधरी, प्रा. श्याम सोनवणे, मनोज चौधरी, विशाल यादव, सुभाष ठाकरे उपस्थित होते. मनीषा गवस, प्रियंका पाटील, कमल सुरवाडे, सीमा जाधव यांनी कैद्यांना राखी बांधली. डॉ. चौधरी यांनी रक्षाबंधन सणाची पार्श्वभूमी, महत्व विषद केले.

जिल्हा रुग्णालयात विद्यार्थिंनींनी बांधली रुग्णांना राखी
धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रुग्णांसोबत रक्षाबंधन हा सण साजरा केला. या वेळी विद्यार्थिंनींनी रुग्णांसह बंदी रुग्ण, पोलीस व कर्मचाऱ्यांना राखी बांधल्या. या वेळी अनेकांचे डोळे पाणावले. क्षेत्रकार्य पर्यवेक्षक प्राचार्य डॉ. उमेश वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. शीला साबळे, गणेश निकुंभ, विनोद पाटील यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, संदीप बागूल, एस.एस. मुंडेले, पी.व्ही. भारंबे, मनोज नन्नवरे उपस्थित होते.

अनाथ मुलांनाही राखी...
मुलांच्या बालगृहात युवा फाउंडेशनच्यावतीने ५५ अनाथ मुलांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. अध्यक्ष प्रतीक निंबाळकर, मेघना कामळकर, रुपाली सोनवणे, कल्याणी कुंभार, प्रणाली निंबाळकर, श्रद्धा पाटील, अनघा नाफडे, निकिता कोल्हे, हेमाली गौतम, पुुनम बारवाल यांनी मुलांना राखी बांधली. विरेन पाटील, मयूर कुळकर्णी, अंकुश श्रीरामे, भूषण पाटील, सुशांत पाटील, सैफ उस्मानी, राज गुजराथी, हितेश शर्मा, मोहित पटेल, रक्षीत इंगळे, दीप पाटील, शुभम लोणेरे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Rakshabandhan - The prisoner and the patient who is filled with purple cloth in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.