‘स्वच्छ भारत’साठी रॅली
By admin | Published: October 3, 2016 03:41 AM2016-10-03T03:41:54+5:302016-10-03T03:41:54+5:30
अविष्कार फाऊंडेशन, ‘लोकमत’, अर्पण संस्था, नशाबंदी मंडळ यांच्यातर्फे कल्याणमध्ये शांतता व स्वच्छ भारत अभियानातंर्गत रॅली काढण्यात आली.
कल्याण : अविष्कार फाऊंडेशन, ‘लोकमत’, अर्पण संस्था, नशाबंदी मंडळ यांच्यातर्फे कल्याणमध्ये शांतता व स्वच्छ भारत अभियानातंर्गत रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन नगरसेवक महेश गायकवाड यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे शाळा क्र. १९ नेतीवली येथे करण्यात आले.
प्रमुख पाहुणे सुमीत पालीवाल, मुख्याध्यापक प्रशांत बोटे, सचिन डामसे, निलेश, निर्मलकुमार जांगियानी यावेळी उपस्थित होते. मॉडेल कॉलेज प्रबोधनकार ठाकरे इंग्लिश विद्यालय, समता प्राथमिक विद्यालय, समता विद्यालय, आर. के. मिश्रा हिंदी विद्यालय, वेदांत कॉलेज, बाबा बोडसे हिंदी विद्यालय, देवशरण विद्यालय, नालंदा प्राथमिक विद्यालय, नालंदा माध्यमिक विद्यालय, ९७/१० ऊर्दू शाळा पत्रीपूल, मॉडेल इंग्लिश स्कूलमधील १४०० विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला.
ही रॅली चक्कीनाका, तिसगाव, म्हसोबा मार्ग मॉडेल इंग्लिश स्कूलमार्गे नेण्यात आली. यावेळी संजय गायकवाड, सुशीलाताई माळी, नानजीभाई ठक्कर, ‘लोकमत’चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान, वितरण सरव्यवस्थापक हरुन शेख, सुनीलदत्त गवरे, बी. जी. उन्नीथन, कैलास सुर्वे, सुधाकर जोशी, संदीप शिंदे, वर्षा विद्या विलास उपस्थित होते. विविध स्पर्धातील विजेत्यांना यावेळी पारितोषिके देण्यात आली. आविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शांतता रॅलीचे हे दुसरे वर्ष आहे.
>विजेत्यांची नावे
घोषणा स्पर्धा : कोमल रेवाले (समता विद्यालय), साधना गुप्ता (आर. के. मिश्रा विद्यालय), विजय शिरसाठ (साकेत कॉलेज)
चित्रकला स्पर्धा : दिशा गायकवाड (मॉडेल इंग्लिश स्कूल), खुशबू यादव (आर. के. मिश्रा विद्यालय), पूजा भगत (समता विद्यालय), पिंकी शुक्ला (आनंद ग्लोबल इंग्लिश स्कूल), श्याम जैसवार (आर. के. मिश्रा विद्यालय), दिनेश गांगुडे (वेदांता कॉलेज)
>निबंध स्पर्धा : वैशाली वैरल (वेदांता कॉलेज), पूजा भगत (समता विद्यालय), हशदा गुजार (साई इंग्लिश स्कूल), मुस्कान मंसुरी (आर के मिश्रा विद्यालय), प्रणव देसाई (साकेत कॉलेज)वक्तृत्व स्पर्धा : पूजा भगत (समता विद्यालय), साधना सिंह (आर.के मिश्रा विद्यालय), दिव्या मुसळे (समता विद्यालय), सोनाली जायसवाल (आर के मिश्रा विद्यालय)