राम नारायण यांना भीमसेन पुरस्कार

By admin | Published: February 4, 2016 04:26 AM2016-02-04T04:26:58+5:302016-02-04T04:26:58+5:30

राज्य शासनातर्फेदेण्यात येणारा भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी पुरस्कार २०१५-१६ साठी ज्येष्ठ सारंगीवादक पंडीत राम नारायण यांना जाहीर झाला आहे.

Ram Na Narayan received the Bhimsen Award | राम नारायण यांना भीमसेन पुरस्कार

राम नारायण यांना भीमसेन पुरस्कार

Next

मुंबई : राज्य शासनातर्फेदेण्यात येणारा भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी पुरस्कार २०१५-१६ साठी ज्येष्ठ सारंगीवादक पंडीत राम नारायण यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी ही घोषणा केली.
सरकारतर्फे शास्त्रीय गायन व वादन क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांच्या नावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ५ लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पं. भाई गायतोंडे, उस्ताद राजा मियाँ, पंं. विजय कोपरकर, पं. केशव गिंडे, पं. सुरेश तळवलकर, पं. नाथराव नेरळकर, कमलताई भोंडे, कल्याणी देशमुख यांच्या समितीने ही निवड केली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Ram Na Narayan received the Bhimsen Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.