Shraddha walker murder case:वसुली करण्याच्या नादात श्रद्धाचा जीव गेला, उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; राम कदमांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 10:17 AM2022-11-24T10:17:02+5:302022-11-24T10:19:39+5:30
श्रद्धा वालकर हत्याकांडाला आता राजकीय वळण आले आहे. श्रद्धाने आफताबच्या तक्रारीचे पत्र २०२० मध्येच लिहिले होते. हे पत्र तिने ...
श्रद्धा वालकर हत्याकांडाला आता राजकीय वळण आले आहे. श्रद्धाने आफताबच्या तक्रारीचे पत्र २०२० मध्येच लिहिले होते. हे पत्र तिने हत्येच्या दीड वर्ष आधीच पालघर पोलिसांना लिहिले होते. मग पोलिसांनी त्यावेळी कारवाई का केली नाही, याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे असा आरोप सध्या आघाडी सरकारवर केला जातोय. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धाच्या कुटुंबियांची हात जोडुन माफी मागावी अशी मागणी भाजप नेता राम कदम यांनी केली आहे.
#उद्धव ठाकरे आणी महा विकास आघाडी ने #श्रद्धा च्या कुटूंबीयांची माफी मागावी
— Ram Kadam (@ramkadam) November 24, 2022
श्रद्धा च्या पत्राची काळजी पूर्वक दखल उद्धव सरकार ने घेतली असती तर श्रद्धाचा निष्पाप जीव वाचला असता.
उद्धव सरकारच्या निष्काळजीपणा आणी धर्माचे तुष्टीकरणचे राजकाराण याची शिकार झाली श्रद्धा
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी जर त्यावेळीच योग्य पाऊले उचलली असती तर श्रद्धाचा जीव वाचला असता. धर्माचे तुष्टीकरण आणि वसुली करण्याच्या नादात एका निष्पाप मुलीचा जीव गेला. तिच्या हत्येला तुम्ही जबाबदार आहात, असे राम कदम यांनी म्हणले आहे.