राम शिंदे यांना आणखी चार खात्याची जबाबदारी

By Admin | Published: June 3, 2017 03:35 PM2017-06-03T15:35:34+5:302017-06-03T16:07:24+5:30

लकमंत्री राम शिंदे यांना विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासप्रवर्ग या चार खात्याचा पदभार दि

Ram Shinde is responsible for four more accounts | राम शिंदे यांना आणखी चार खात्याची जबाबदारी

राम शिंदे यांना आणखी चार खात्याची जबाबदारी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

जामखेड, दि. 3 -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासप्रवर्ग या चार खात्याचा पदभार दिला. याबाबतची माहिती तालुक्यात मिळताच फटाके व पेढे वाटून स्वागत करण्यात आले. 
पालकमंत्री राम शिंदे यांनी राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री    म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर खाते सक्षमपणे सांभाळले. अधिक मेहनत घेऊन राज्यात खात्याचा प्रभाव दाखवून दिला. या मेहनतीचे फळ म्हणून मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटपदी बढती दिली. व जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री तसेच पालकमंत्री अ. नगर असे खाते दिले. मंत्री राम शिंदे यांनी या जलसंधारण खात्याला न्याय देऊन व मुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थ ठरवीत जलसंधारण खात्यामार्फत राज्यात कामाचा धडाका सुरू करून खात्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. जलसंधारण कामे प्रभावीपणे राबवून राज्यातील अनेक गावे टंचाईमुक्त केले. मंत्री शिंदे यांनी खात्याला न्याय देऊन व राज्यात दौरे केले. व कामाला चालना दिली. 
तसेच राज्यातील झालेल्या जि. प., पं. स. निवडणूक, राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यात मंत्री राम शिंदे यांचा मोठा वाटा होता. पक्ष संघटना व राज्याचा कारभार करताना त्यांनी दाखवलेली तत्परता यामुळे मंत्री शिंदे यांना विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासप्रवर्ग कल्याण असे चार खाते मिळाली. व कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला. जामखेडकरांना याचा सार्थ अभिमान आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातून मंत्री शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Web Title: Ram Shinde is responsible for four more accounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.