संजय राऊतांपाठोपाठ महायुतीतील रामदास आठवलेही घेणार शरद पवारांची भेट, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 02:42 PM2019-11-04T14:42:10+5:302019-11-04T14:46:54+5:30
रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना लवकर महायुतीच्या सरकारचा शपथविधी कसा होईल तशी भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई - फक्त शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी शिवजीपार्कवर होईल असा दावा संजय राऊत यांनी करू नये. शिवाजीपार्कवर शपथविधी केवळ शिवसेनेचा नाही तर भाजपसह शिवसेना आरपीआय महायुतीच्या मंत्र्यांचा झाला पाहिजे असे सांगत संजय राऊत यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे हा आग्रह सोडावा. काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा दुराग्रह संजय राऊत यांनी सोडावा. राऊत यांनी हे लक्षात घ्यावे की त्यांच्यापेक्षा अधिक जवळचे संबंध माझे शरद पवारांशी आहेत. त्यामुळे लवकरच मी शरद पवार यांची भेट घेणार आहे असं आठवलेंनी सांगितले.
वांद्रे येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडावा; शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपद आणि 16 मंत्रिपदांचा भाजपचा प्रस्ताव स्वीकारावा, त्यात आणखी दोन मंत्रीपदे शिवसेनेला वाढवून द्यावीत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना लवकर महायुतीच्या सरकारचा शपथविधी कसा होईल तशी भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.
त्याचसोबत जनतेने भाजपा शिवसेनेला बहुमताचा जनादेश दिला आहे. त्या विपरीत भूमिका शिवसेनेने घेऊ नये. शरद पवारांचा पाठिंबा फक्त संजय राऊत मिळवू शकतात असे नाही माझे शरद पवारांशी अधिक जवळचे संबंध आहेत. भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असे सत्तवाटप करून महाराष्ट्राच्या हितासाठी लवकर सरकार स्थापन करावे ही माझी भूमिका आहे. पण वेळ पडल्यास आपण लवकर शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
शिवसेनेचे 20 ते 25 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; आमदाराचा खळबळजनक दावा
'संजय राऊत शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी अंकुश ठेवावा'
संजय राऊत म्हणजे बेताल अन् विदूषक; 'तरुण भारत'च्या अग्रलेखातून शिवसेनेवर जोरदार प्रहार
संजय राऊत यांनी 'औकात' काढली; शिवसेना, भाजपामधील तणाव वाढणार?
राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका होणार?; तयारीला लागण्याचे भाजपा मंत्र्याचे कार्यकर्त्यांना आदेश
..म्हणून शिवसेना घेणार राज्यपालांची भेट; संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण'