मंत्रिमंडळ विस्तार झाल्यामुळे आता विरोधकांचे तोंड बंद होईल, रामदास आठवलेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 04:14 PM2022-08-09T16:14:21+5:302022-08-09T16:15:06+5:30

Ramdas Athawale : महाराष्ट्र राज्याचा चांगला विकास करण्यासाठी हे मंत्री चांगली जबाबदारी पार पाडतील. राज्यात दलित आदिवासींच्या प्रश्नांकडे चांगले लक्ष देतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

ramdas athawale criticised opposition on eknath shinde cabinet expansion | मंत्रिमंडळ विस्तार झाल्यामुळे आता विरोधकांचे तोंड बंद होईल, रामदास आठवलेंचा टोला

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यामुळे आता विरोधकांचे तोंड बंद होईल, रामदास आठवलेंचा टोला

Next

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा आज अखेर मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला. मंगळवारी शिंदे गटाच्या आणि भाजपच्या मिळून एकूण 18 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवीन 18 मंत्र्यांनी शपथ घेत मंत्रिमंडळ विस्तार झाला असल्याने आता विरोधी पक्षाचे तोंड बंद होईल, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळात सर्व मंत्री अनुभवी असल्याने हे मंत्रिमंडळ मजबूत मंत्रिमंडळ आहे. महाराष्ट्र राज्याचा चांगला विकास करण्यासाठी हे मंत्री चांगली जबाबदारी पार पाडतील. तसेच, चांगला राज्य कारभार करतील. राज्यात दलित आदिवासींच्या प्रश्नांकडे चांगले लक्ष देतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 39 दिवस झाले तरी राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यामुळे विरोधी पक्षांतर्फे अनेकदा राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, अखेर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आज पार पडला. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या गटातील 9 आणि भाजपच्या 9 आमदारांना मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे. 

'या' नेत्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपमधून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आणि मंगलप्रभात लोढा यांनी यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.  

Web Title: ramdas athawale criticised opposition on eknath shinde cabinet expansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.