“राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 06:04 PM2021-04-12T18:04:51+5:302021-04-12T18:07:39+5:30
महाविकास आघाडी सरकारवर भाजपसह अन्य विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीत आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी मनसुख हिरेन यांचा झालेला संशयास्पद मृत्यू, सचिन वाझे (Sachin Vaze Case) यांना या प्रकरणी झालेली अटक, आधी परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) आणि नंतर सचिन वाझे यांच्या पत्रानंतर महाविकास आघाडी सरकारवर भाजपसह अन्य विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. यातच आता रिपाइं नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (ramdas athawale criticised thackeray govt over various issues)
अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतल्या पब, बार, रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप करत परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर निकाल देताना अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या प्रकरणी महाराष्ट्रातील सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही राजीनामा द्यावा लागेल, असा हल्लाबोल रामदास आठवले यांनी केला आहे.
तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी; जयंत पाटलांना सदाभाऊंचा टोला
अशा प्रकारच्या अजून नोटिसा पाठवल्या जातील
माजी पोलीस आयुक्तांनी १०० कोटी वसुलीचा आरोप अनिल देशमुखांवर लावला आहे. देशमुख यांच्या दोन सहाय्यकांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अजून नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे सरकारमधले सर्व मंत्री राजीनामा देतील आणि शेवटी उद्धव ठाकरे यांनाही राजीनामा द्यावा लागेल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
म्हणून राज्यात कोरोना रुग्णवाढ
ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, गर्दी जास्त होत आहे, अशा ठिकाणी लॉकडाऊन लागू करायला हवा. मजुरांना याचा फटका बसता कामा नये, याची काळजी घ्यायला हवी. पण राज्य सरकारने योग्य ती पाऊले उचलली नाहीत म्हणून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.
“पुढे काय परिस्थिती असेल, आता सांगता येत नाही, आढावा घेऊन निर्णय घेणार”
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन करावा, असे मत तज्ज्ञांनी या बैठकीत व्यक्त केले.