Rajya Sabha Election 2022: “देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखविली, बड्या बड्या वाघांची मान झुकविली”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 07:11 PM2022-06-11T19:11:36+5:302022-06-11T19:12:52+5:30

Rajya Sabha Election 2022: निवडणूक कशी जिंकायची ते देवेंद्र फडणवीस यांनी शिकविले आहे, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे.

ramdas athawale praises bjp leader devendra fadnavis over rajya sabha election 2022 victory | Rajya Sabha Election 2022: “देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखविली, बड्या बड्या वाघांची मान झुकविली”

Rajya Sabha Election 2022: “देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखविली, बड्या बड्या वाघांची मान झुकविली”

Next

मुंबई: तब्बल २४ वर्षानंतर झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मोठेच राजकीय नाट्य पाहायला मिळाले. मतदान पार पडल्यानंतर अखेरीस ९-१० तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला. अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठावर्धक झालेल्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. यातच आता रिपाइं प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक करत, शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. 

राज्यसभेसाठीची सहावी जागा भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या सहाव्या जागेसाठी भाजपने धनंजय माहडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. कोणत्याही परिस्थितीत ही जागा आम्हीच जिंकू असा दावा भाजप आणि महाविकास आघाडीकडून केला जात होता. प्रत्यक्षात मात्र या जागेवर भाजपाचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. छोटे पक्ष तसेच अपक्ष आमदारांनी महाडिक यांना मतदान केले. महाडिक यांना ४१ मते मिळाली तर संजय पवार यांना ३३ मते मिळाली. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या या स्मार्ट खेळीचे भाजप नेत्यांकडून कौतुक केले जात आहे. यात आता रामदास आठवले यांची भर पडली आहे. 

देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखविली

रामदास आठवले यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आपली जागा दाखविली आहे. निवडणूक कशी जिंकायची ती फडणवीस यांनी शिकविली आहे. फडणवीस यांनी तिसरी जागा जिंकून बड्या बड्या वाघांची मान झुकविली आहे, अशी बोचरी टीका करत रामदास आठवले यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना डिवचल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, भाजपला शुभेच्छा. कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो, मात्र ‘अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन है’. आमचे नेते ५० वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षे ते विरोधात, तर अर्धी वर्षे सत्तेत आहेत. केंद्र सरकार दडपशाही करते आहे. जास्त बोललात तर ईडीची नोटीस येते. ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. एकादा अपयश येत तेव्हा लोकांना असे वाटते की यांची स्ट्रॅटेजी चुकली, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. तसेच आम्ही राष्ट्रवादीला पाठिंब्याची अपेक्षा असणाऱ्या संजय शिंदे यांचे मत मिळाले नाही, याबाबत बसून चर्चा करणार आहोत. या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हे सांगायची गरज नाही आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 
 

Web Title: ramdas athawale praises bjp leader devendra fadnavis over rajya sabha election 2022 victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.