Ramdas Athawale : "उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले"; रामदास आठवलेंची भन्नाट कविता...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 10:27 AM2022-10-09T10:27:10+5:302022-10-09T10:46:14+5:30

Ramdas Athawale And ShivSena Uddhav Thackeray : केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Ramdas Athawale reaction over ShivSena Uddhav Thackeray Over election sign bow and arrow | Ramdas Athawale : "उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले"; रामदास आठवलेंची भन्नाट कविता...

Ramdas Athawale : "उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले"; रामदास आठवलेंची भन्नाट कविता...

googlenewsNext

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये वाद सुरु आहे. खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्हीबाजूने केला जात होता. हा वाद सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगाकडेही पोहचला. शिंदे गटाने शिवसेनेवर दावा करत नाव आणि चिन्ह आम्हाला वापरण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे-ठाकरे गटाला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक पाहता निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हा तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जोरदार झटका बसला आहे. 

केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "निवडणूक आयोगाने जेंव्हा धनुष्यबाण गोठवले तेव्हा उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले! निवडणूक आयोगाने शिवसेना नाव गोठवले कारण उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या मागे लागून एकनाथ शिंदेंना आमच्याकडे पाठवले!" असं आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

निवडणूक आयोगाने सोमवारपर्यंत नव्या चिन्हाबाबत निर्णय घेण्यासाठी पर्याय दिला आहे. शिवसेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत केलेलं एक ट्विट चर्चेत आले आहे. नार्वेकरांनी एक पोस्ट केलीय त्यात वाघ आणि आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हटलंय. त्यामुळे नव्या चिन्हामध्ये ठाकरे गटाकडून वाघ हे चिन्ह मागण्यात येणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

"संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही म्हणणाऱ्या युवराजांचा पक्ष, चिन्ह इतिहासात जमा"

मनसेनेशिवसेना आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीच "घड्याळ"नाहीतर अबू आझमीच्या "सायकल"चाच आधार" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.  आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "धनुष्य बाण चिन्ह गोठवल गेलंय, या पुढे शिवसेना हे नाव पण वापरता येणार नाही... आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीच "घड्याळ"नाहीतर अबू आझमीच्या "सायकल"चाच आधार आहे... संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही असे म्हणणारे युवराज यांचा पक्ष आणि चिन्ह आता इतिहासात जमा..." असं गजानन काळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Ramdas Athawale reaction over ShivSena Uddhav Thackeray Over election sign bow and arrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.