रामदास आठवले म्हणतात, ‘...तर पुढचा मुख्यमंत्री मीच’; फडणवीस-ठाकरेंना केली विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 06:00 AM2024-08-02T06:00:06+5:302024-08-02T06:00:20+5:30
यांचा वाद मिटला नाही, तर मुख्यमंत्रिपदी मी असेल, असे विधान रामदास आठवले यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस वाद सुरू आहेत. राजकारणात विरोधक असतात. माझी दोघांनाही विनंती आहे की, दाेघेही राजकारणात राहा. राहतीलच. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांनी फाेडले ही चीड ठाकरे यांनी काढून टाकावी. पुन्हा दोघांची मैत्री व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र, यांचा वाद मिटला नाही, तर मुख्यमंत्रिपदी मी असेल, असे विधान केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त सारसबाग परिसरात मातंग समाज समन्वय समिती, पुणे यांच्यातर्फे अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.