Ramdas Athawale : "ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले आहेत धंदे, त्यांचे नाव एकनाथ शिंदे"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 06:02 PM2022-09-02T18:02:26+5:302022-09-02T18:23:08+5:30

Ramdas Athawale And Eknath Shinde : शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचा कारभार पुढील अडीच वर्ष चांगला चालवतील. एवढंच काय त्यानंतरची पाच वर्षे हे सरकार सत्तेत येईल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे. 

Ramdas Athawale Slams Shivsena Uddhav Thackeray Over CM Eknath Shinde | Ramdas Athawale : "ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले आहेत धंदे, त्यांचे नाव एकनाथ शिंदे"

Ramdas Athawale : "ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले आहेत धंदे, त्यांचे नाव एकनाथ शिंदे"

Next

केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी "ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले आहेत धंदे, त्यांचे नाव एकनाथ शिंदे, ते बाळासाहेब सच्चे बंदे" असं म्हणत एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं आहे. तसेच धनुष्यबाण निशाणी शिंदेंनाच मिळणार असंही म्हटलं आहे. "एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, एक मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे शिवसेनेला एक जबरदस्त असा धक्का दिला."

"शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचा कारभार पुढील अडीच वर्ष चांगला चालवतील. एवढंच काय त्यानंतरची पाच वर्षे हे सरकार सत्तेत येईल" असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे. "गेल्या 8 ते 10 वर्षांपासून भाजपासोबत रिपब्लिकन पक्ष काम करत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात एक पद मिळावे. तसेच खाते कोणते द्यायचे याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील .चांगलं खातं मिळावं ही अपेक्षा आहे" असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.

"खरी शिवसेना ही आता एकनाथ शिंदेंच्या बाजुने"

"ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या सत्तेचे बंद केले आहेत धंदे, त्यांचे नाव एकनाथ शिंदे. आता एकनाथ शिंदे राहिलेले नाहीत अंधे, ते आहेत बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे बंदे. बाळासाहेब ठाकरेंना मानणारे एकनाथ शिंदे. त्यामुळेच शिंदेना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. खरी शिवसेना ही आता एकनाथ शिंदेंच्या बाजुने आहे. त्यामुळेच इलेक्शन कमिशनकडून धनुष्य़बाण ही निशाणी मिळेल" असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

"मनसेला सोबत घेतलं तर देशपातळीवर नुकसान"

मनसेला सोबत घेतलं तर देशपातळीवर नुकसान होऊ शकतं. राज ठाकरेंची भूमिका मराठी माणसांसाठी महत्त्वाची आहे. पण मुंबईतल्या इतर लोकांना विरोध करण्याच्या भूमिकेमुळे भाजपाला हे परवडणारं नाही, असं रामदास आठवलेंनी सांगितले. राज ठाकरे चांगले नेते आहेत. सभा होतात. पण त्यांना मतं मिळत नाहीत, असंही आठवलेंनी सांगितलं. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 


 

Web Title: Ramdas Athawale Slams Shivsena Uddhav Thackeray Over CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.