Ramdas Athawale : "सुषमा अंधारे टीका करण्यात एक्सपर्ट, माझ्या पक्षातही होत्या पण..."; रामदास आठवलेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 03:34 PM2022-12-10T15:34:40+5:302022-12-10T15:41:56+5:30

Ramdas Athawale Slams Sushma Andhare : रामदास आठवले यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना खोचक टोला लगावला आहे.

Ramdas Athawale Slams Sushma Andhare Over Shivsena Maharashtra Politics | Ramdas Athawale : "सुषमा अंधारे टीका करण्यात एक्सपर्ट, माझ्या पक्षातही होत्या पण..."; रामदास आठवलेंचा खोचक टोला

Ramdas Athawale : "सुषमा अंधारे टीका करण्यात एक्सपर्ट, माझ्या पक्षातही होत्या पण..."; रामदास आठवलेंचा खोचक टोला

Next

केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना (Sushma Andhare) खोचक टोला लगावला आहे. "सुषमा अंधारे आधी माझ्या पक्षातही होत्या पण सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत उपनेतेपद दिलं आहे. असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच अंधारे या टीका करण्यात 'एक्सपर्ट' आहेत असंही आठवलेंनी सांगितलं, 

"शिवसेनेने सुषमा अंधारेंना टीका करण्यासाठीच आणलं आहे. अंधारे आमच्याही पक्षात होत्या, पण आता त्या शिवसेनेत गेल्या आहेत. त्या तशा संघर्षशील वक्त्या आहेत. त्या काही वर्षे माझ्या पक्षात होत्या, पण सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना उपनेतेपद दिलं आहे" असं म्हणत रामदास आठवले यांनी अंधारेंवर जोरदार निशाणा साधला आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.

"सुषमा अंधारे या टीका करण्यात एक्सपर्ट आहेत. त्यांनी सारखी टीका करू नये. टीका करायला हरकत नाही, पण सारखी टीका करू नये" असा सल्लाही आठवलेंनी दिला आहे. भाजपा आणि शिंदे गटाकडून महाप्रबोधन यात्रेवर सातत्याने टीका केली जाते, यासंदर्भात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना अंधारे यांनी भाजपला एकप्रकारे आव्हानच दिलंय. तसेच, माझी भरचौकात हत्या करायची आहे का, असा सवालही विचारला. 

महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याण पूर्व मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेपूर्वी अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला लक्ष्य केलं. गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राने एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या जनतेला खूश करण्यासाठी उपयोगी पडले असतील तर चांगली गोष्ट आहे, असे म्हणत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Read in English

Web Title: Ramdas Athawale Slams Sushma Andhare Over Shivsena Maharashtra Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.