सरसंघचालकांच्या 'त्या' मताशी रामदास आठवले असहमत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 03:49 PM2019-12-27T15:49:06+5:302019-12-27T15:58:52+5:30
मोहन भागवत यांनी हैदराबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात हिंदू धर्मावर आपले मत मांडले होते.
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष असलेला रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हिंदू संदर्भातील वक्तव्यावर असहमती दर्शविली आहे.
सरसंघचालकांनी गुरुवारी म्हटले होते की, देशातील 130 कोटी लोकांना धर्म आणि संस्कृतीच्या पुढे जाऊन आम्ही हिंदूच मानतो. यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले यांनी असहमती दर्शविली. सर्व भारतीय हिंदू आहे, हे म्हणणे उचित नाही. एका काळी आपल्या देशात सर्व बौद्ध होते. जर भागवतांना देशातील सर्व लोक भारतीय म्हणयाचं असेल तर ठिकच आहे. देशात बौद्ध, शिख, हिंदू, मुस्लीम, पारसी, जैन आणि लिंगायत पंथाचे लोक राहतात, असंही ते पुढं म्हणाले.
मोहन भागवत यांनी हैदराबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात हिंदू धर्मावर आपले मत मांडले होते. त्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी कडाडून टीका केली आहे. यामध्ये एमआयएम प्रमुख असुद्दीन ओवेसी यांचा देखील समावेश आहे. ओवसी म्हणाले की, आरएसएसला वाटते देशात केवळ एकच धर्म असावा. मात्र जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे, तोपर्यंत हे होऊ शकणार नाही. ही भूमी सर्व धर्मांची असल्याचे ओवेसी यांनी सांगितले होते.