'मातोश्री'वरील १०० खोक्याचा हिशोब द्यावा लागेल; आदित्य उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 10:57 AM2022-09-03T10:57:07+5:302022-09-03T10:57:51+5:30
आवाज द्यायचं आमच्या जीवावर सुरू होते. अनेक केसेस आम्ही घेतल्यात. आम्ही पक्षासाठी केसेस घेतल्या तुमचं योगदान काय? असा सवाल कदमांनी उपस्थित केला
रत्नागिरी - शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर बसले. उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून आदित्य ठाकरे मंत्री झाले. ते बेडकासारख्या उड्या मारताय. आता तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय, गेल्या अडीच वर्षात कुणाला भेटला? मातोश्री सोडलीच नाही. आदित्य ठाकरेशिवसेना मंत्र्यांची खाती सांभाळायचा. कुणाला काम करू द्यायचा नाही. प्रदुषण नियंत्रण महामंडळाकडून पर्यावरण खात्यात १०० कोटी रुपये घेतलेत. त्याची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे. त्या १०० खोक्याचे काय केले? १०० कोटीचं काय केले त्याचा हिशोब द्यावा लागेल. मातोश्रीत किती मिठाईचे खोके गेले? असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केला आहे.
रामदास कदम म्हणाले की, आदित्य ठाकरेंचे वय ३१ वर्ष आणि माझं राजकारणातील वय ५२ वर्ष आहे. त्यांचा राजकारणाचा अभ्यास किती हे महाराष्ट्राला कळलं आहे. आपलं वय काय, आपण काय बोलतोय, ठाकरे कुटुंबातील आहोत याचे भान ठेवायला हवे होते. गुवाहाटीला गेलेले आमदार मतदारसंघात कसे पाय ठेवतात ते पाहू असं म्हटलं. ते परतले. मतदारसंघात गेले. प्रत्येक मतदारसंघात प्रचंड स्वागत झाले. काय उखडलं तुम्ही? सगळे आमदार वरळी मतदारसंघातून गेले काय केले तुम्ही? आवाज द्यायचं आमच्या जीवावर सुरू होते. अनेक केसेस आम्ही घेतल्यात. आम्ही पक्षासाठी केसेस घेतल्या तुमचं योगदान काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नवीन मातोश्रीचा सोर्स काय?
त्याचसोबत नवीन मातोश्रीचा सोर्स काय? स्वत: खोके घ्यायचे आणि दुसऱ्यांवर संशय निर्माण करायचा. बोलून काय होत नाही, सभा घेऊन काय होत नाही. मग संशय निर्माण करायचा. ही शेवटची धडपड आहे. आम्हाला कुणी शिकवू नये. पक्ष वाढवण्यात योगदान आमचं आहे. शिवसेना-भाजपा म्हणून तुम्ही लढला. त्यांचे १०६ आले आणि तुमचे ५५ आले. मातोश्रीवरची मिठाई बाहेर काढली असती तर तुमचेही जास्त निवडून आले असते. लोकांची तोंड गोड केले असते तर मतं मिळाली असती. पण मुख्यमंत्री व्हायचं म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले. गद्दार उद्धव ठाकरे आहेत एकनाथ शिंदे नाहीत, ५० आमदार नाहीत असा घणाघातही रामदास कदमांनी केला.