Ramdas Kadam : "बाळासाहेबांची शपथ घेणं हे चुकीचं, संजय राऊतांनी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 11:26 AM2022-07-31T11:26:26+5:302022-07-31T11:37:16+5:30

Ramdas Kadam Slams Shivsena Sanjay Raut : "संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्रही आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती" असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

Ramdas Kadam Slams Shivsena Sanjay Raut Over ED raid | Ramdas Kadam : "बाळासाहेबांची शपथ घेणं हे चुकीचं, संजय राऊतांनी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती"

Ramdas Kadam : "बाळासाहेबांची शपथ घेणं हे चुकीचं, संजय राऊतांनी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती"

Next

मुंबई - शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांच्या घरी पत्राचाळ प्रकरणी ईडीची टीम पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली. "कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन" असं संजय राऊत यांनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यावरून आता रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी राऊतांना खोचक टोला लगावला आहे. 

"संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्र आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती" असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच "गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर शरद पवार यांचाच अधिक प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी जर पवारांची शपथ घेतली असती तर अनेकांना त्यांचे म्हणणे खरे वाटले असते" अशा शब्दांत जोरदार निशाणा साधला आहे. यासोबतच "शरद पवारांच्या नादी लागून संजय राऊतांनी शिवसेना संपवली" अशी बोचरी टीकाही रामदास कदमांनी केली आहे. 

"राज्यात महाविकास आघाडीचा उदय होण्यास सर्वाधिक जाबाबदार हे संजय राऊत राहिले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार यांच्याबरोबर युती करण्यात जास्त रुची होती. मी मात्र, याला कायम विरोध केला होता, कायम भाजपासोबत युती करावी अशी भूमिका घेतल्याचं रामदास कदमांनी सांगितलं आहे. TV9 मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यास यशस्वी ठरले. उद्धव ठाकरेंना मी दोष देणार नाही, परंतू त्यांचे मन राऊतांनी वळविले. रोज सकाळी ते रात्री झोपेपर्यंत राऊत टीका करत सुटायचे. महाविकास आघाडीचे एजंट सारखे वागत होते. राऊत माझे चांगले मित्र आहेत, त्यांना मी सांगितलेले हे थांबवा, परंतू ऐकतील ते संजय राऊत कुठले, असे रामदास कदम यांनी म्हटले.

माझा मुलगा योगेश कदम याला राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी अनिल परब यांनी काम केले. आमची नगरपालिका राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे काम त्यांनी केले.  शिवसेना कोणी संपविली? याच लोकांनी असा आरोप कदम यांनी केला. राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला अजित पवार 10 कोटी रुपये देतात. उद्धव ठाकरेंना बरे नव्हते, त्यामुळे ते मंत्रालयात जात नव्हते. यामुळे पवारांना आंदनच मिळाले असा आरोप कदम यांनी केला. संजय राऊत हे खचणारे नाहीत. ते ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. ते कोणत्याही प्रश्नाची उत्तरे द्यायचे, आपण पाहिले. यामुळे ते ईडीच्या चौकशीला सामोरे जातील असेही कदम म्हणाले. 

 

Web Title: Ramdas Kadam Slams Shivsena Sanjay Raut Over ED raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.