काका, काका म्हणायचे अन् माझेच खाते घेऊन बसले; कदमांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 11:14 AM2022-07-19T11:14:52+5:302022-07-19T11:15:36+5:30

पक्ष फुटतोय तरी तुम्हाला शरद पवार का हवेत? हा हट्ट कुणाचा आहे? तुमच्या बाजूला पक्षद्रोही आहेत ते ओळखा असं रामदास कदम यांनी सांगितले.

Ramdas Kadam target Shivsena Aditya Thackeray, Uddhav Thackeray | काका, काका म्हणायचे अन् माझेच खाते घेऊन बसले; कदमांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

काका, काका म्हणायचे अन् माझेच खाते घेऊन बसले; कदमांचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

googlenewsNext

मुंबई - किती लोकांची तुम्ही हकालपट्टी करणार आहात? इतरांची हकालपट्टी करण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला शिवसैनिक आहेत की पवारांची माणसं ते पाहा. आमदारांना शिवीगाळ, आक्रमक भाषा वापरली गेली. राष्ट्रवादी सोडावी इतकीच मागणी आमदारांची होती, बंडखोर आमदारांची येण्याची तयारी होती पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही अशी खंत शिवसेनेतून हकालपट्टी केलेले नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली. 

रामदास कदम म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांना संपवून १०० आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. ५१ आमदारांनी हे पाऊल उचललं नसतं तर पुढील निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदारही निवडून आले नसते. महाराष्ट्राचा खजिना अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी लुटला. प्रशासकीय अनुभव नसल्याने उद्धव ठाकरेंना फसवलं. पक्ष फुटतोय तरी तुम्हाला शरद पवार का हवेत? हा हट्ट कुणाचा आहे? तुमच्या बाजूला पक्षद्रोही आहेत ते ओळखा. बेईमानी आमच्या रक्तात नाही. आम्हाला शिवसेना वाचवायची आहे असं त्यांनी सांगितले.  

आदित्यला साहेब म्हणावं लागतं ही खंत
त्याचसोबत मला आदित्य साहेब म्हणावं लागतं. माझं वय ७० आहे. कारण ते ठाकरे आहेत. मातोश्रीतले आहेत. आदित्य ठाकरेंनी संयम पाळायला हवा होता. जे जे आमदार गेले त्यांनी पक्षासाठी योगदान दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी दिले नाही माणूस कर्तृत्वाने मोठा होता. पक्षासोबत माणसांचेही योगदान आहे. मंत्री बनवला म्हणजे भीक दिली असं नाही हे उद्धव ठाकरेंनी समजू नये असंही रामदास कदम म्हणाले. 

तसेच दीड वर्ष आदित्य ठाकरे मी पर्यावरण मंत्री असताना माझ्या कॅबिनमध्ये येऊन बसायचे. मला म्हणायचे भाई या अधिकाऱ्यांना बोलावा, सचिवांना बोलवा, बैठक लावा. बाहेरच्या माणसांना बसवून मंत्रालयात अधिकृत बैठका घेत येत नाही. तरीही मी उद्धव ठाकरेंचे चिरंजीव म्हणून बैठका लावल्या. प्लास्टिक बंदी मी केली आणि श्रेय आदित्यला मिळाले. काका काका म्हणणारे माझेच खाते घेऊन बसणार आहेत हे मला माहित नव्हतं. इतके राजकारण आम्ही घरात कुटुंबात केले नाही असा घणाघात रामदास कदमांनी आदित्य 
ठाकरेंना लगावला. 

Read in English

Web Title: Ramdas Kadam target Shivsena Aditya Thackeray, Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.