सहकार पंढरीत साकारणार रामदेवबाबांचा दूध प्रकल्प
By admin | Published: November 16, 2016 05:34 AM2016-11-16T05:34:31+5:302016-11-16T05:34:31+5:30
सहकाराच्या पंढरीत योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली उद्योग समूहाच्या पहिल्या दूध प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अहमदनगर : सहकाराच्या पंढरीत योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली उद्योग समूहाच्या पहिल्या दूध प्रकल्पाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद््घाटन होणार आहे़ संत ज्ञानेश्वर यांची कर्मभूमी असलेल्या नेवासा तालुक्यातील खडकाफाटा येथे प्रकल्प साकारला आहे.
देशातील सर्वांत मोठ्या या प्रकल्पात सुमारे ५०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे़ पतंजली उद्योग समूहाने याद्वारे दूध व्यवसायात पर्दापण केले आहे़ प्रकल्पामुळे देशी गाईंची वृद्धी होऊन गाईंचे महत्त्व वाढेल़ पतंजली उद्योग समूहाची दूध व्यवसायात तीन लाख कोटींची उलाढाल आहे़ शेतकऱ्यांकडून दूध घेवून तूप तयार केले जाईल.
पहिल्या टप्प्यात २५० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे़ दुसऱ्या टप्प्यात उर्वरीत २५० कोटींचे गुंतवणूक करून ५० जातीवंत वळू ब्राझीलवरून आणण्यात येणार आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार गोशाळा सुरू करण्याचा संकल्प आहे़ (प्रतिनिधी)