रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; राजभवनात मराठीतून घेतली पदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 06:12 AM2023-02-19T06:12:58+5:302023-02-19T06:13:28+5:30
शपथविधीनंतर न्यायमूर्ती गंगापूरवाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
मुंबई - संसदीय राजकारण आणि समाजकारणाचा पाच दशकांचा अनुभव असलेले रमेश बैस यांनी शनिवारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी त्यांना पदाची शपथ दिली. मूळ छत्तीसगढचे असूनही महाराष्ट्राच्या मातृभाषेत शपथ घेत त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. रमेश बैस हे महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत.
शपथविधीनंतर न्यायमूर्ती गंगापूरवाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्राला अभ्यासू व्यक्तिमत्त्व राज्यपाल म्हणून लाभले आहे. त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांविषयी गौरवोद्गार काढले.
झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन मुंबई येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राज्यपालांना पदाची शपथ दिली. राज्यपालांनी मराठीतून शपथ घेतली. pic.twitter.com/2DZPdKWG6V
— Governor of Maharashtra (@maha_governor) February 18, 2023