आमदार रमेश कदमचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 01:42 AM2017-03-24T01:42:15+5:302017-03-24T01:42:15+5:30
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांचा जामीन अर्ज
सोलापूर : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश विभा कंकणवाडी यांनी गुरुवारी फेटाळून लावला.
महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अभिमन्यू क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आ़ कदम यांच्यासह इतरांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ आरोपी कदम यांना ट्रान्स्फर वॉरंटमध्ये मध्यवर्ती कारागृहातून चौकशीसाठी २९ डिसेंबर २०१६ रोजी सोलापुरात आणण्यात आले होते. चौकशीनंतर पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले.
दहीसर व सोलापूरचे प्रकरण एकच असून या प्रकरणातील इतर आरोपींना जामीन मिळाला असून आपल्यालाही जामीन मिळावा, अशी मागणी आरोपी रमेश कदम याने न्या़ कंकणवाडी यांच्या न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे केली होती़ मात्र न्यायाधिशांनी ती फेटाळून लावली़ (प्रतिनिधी)