रमेश कदम जालना न्यायालयात हजर, पुढील सुनावणी २२ डिसेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:33 AM2017-12-14T01:33:02+5:302017-12-14T01:33:38+5:30
येथील अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ८ कोटी रुपयांच्या घोटाळ््याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले.
जालना : येथील अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ८ कोटी रुपयांच्या घोटाळ््याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. पुढील सुनावणी २२ डिसेंबरला होणार आहे.
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातंर्गत बोगस लाभार्थी दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा तीन वर्षांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी कदमला अटक करण्यात आली. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या काळात घोटाळा झाल्याचे फिर्यादीत म्हटले होते. गैरव्यवहारप्रकरणी जालना शाखेच्या अधिकाºयांसह कदमवर गुन्हे दाखल होते. याचिका रद्द करण्याची मागणी कदमने स्वत: युक्तीवाद करताना केली. त्यानंतर न्यायालयाने सरकारी वकिलांना आपले म्हणणे मांडण्यासाठी २२ डिसेंबरला सुनावणी ठेवली आहे.