रमेश कदमच्या कोठडीत वाढ

By admin | Published: August 26, 2015 01:01 AM2015-08-26T01:01:43+5:302015-08-26T01:01:43+5:30

अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांची पोलीस कोठडी विशेष न्यायालयाने ३१ आॅगस्टपर्यंत वाढवली.

Ramesh Kadam's custody extended | रमेश कदमच्या कोठडीत वाढ

रमेश कदमच्या कोठडीत वाढ

Next

मुंबई: अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांची पोलीस कोठडी विशेष न्यायालयाने ३१ आॅगस्टपर्यंत वाढवली.
कोठडीची मुदत संपल्याने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने ७(सीआयडी) कदम यांना मंगळवारी विशेष न्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. त्यापैकी कदम यांनी वितरीत केलेल्या १४७ कोटी रूपयांचा तपशील मिळाला आहे. मात्र याचा पुढील तपास करायचा असल्याने कदम यांच्या कोठडीत वाढ करावी, अशी मागणी विभागाने केली.
दुसरीकडे कदम यांनी पोलिसांवर आरोप केला की, क७ोठडीत बसण्याची व झोपण्याची व्यवस्था योग्य प्रकारे केली जात नाही. तसेच मी तपासालाही तयार आहे, असा दावा कदम यांच्यावतीने करण्यात आला.
जालना येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात ८ कोटी ५७ लाख ८८६ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चार महिन्यांपासून फरार असलेल्या जिल्हा व्यवस्थापक मधूकर बापूराव वैद्य व लिपीक अशोक एकनाथ खंदारे या दोघांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी सायंकाळी अटक केली. मंगळवारी दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात वैद्य व खंदारे यांनी संगनमत करून महामंडळाच्या ८ कोटी ५७ लाख ८८६ रुपयाच्या निधीचा अपहार केल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर महामंडळाचे औरंगाबाद परिक्षेत्राचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल म्हस्के यांनी २३ एप्रिल रोजी कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या दोघांविरूद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच हे दोघेही फरार झाले होते. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळला होता. अखेर चार महिन्यांनंतर २४ आॅगस्ट रोजी वैद्य याला बीड येथून, तर खंदारे याला जालन्यातून अटक करण्यात आली.

Web Title: Ramesh Kadam's custody extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.