भाजपाने शिवसेनेकडून हिसकावलं रामटेक
By admin | Published: January 9, 2017 12:06 PM2017-01-09T12:06:15+5:302017-01-09T12:14:46+5:30
शिवसेनेला मात्र अपयश आल्याचे दिसतं आहे. रामटेक नगरपालिकेतील शिवसेनेच्या सत्तेला भाजपाने सुरुंग लावत विजय मिळवला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 9 - नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये नागपूरच्या 9 तर गोंदियातल्या 2 नगरपरिषदा मिळून एकूण 11 नगरपालिकांचा समावेश आहे. सकाळी 10 वाजाता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. अणेंच्या विदर्भ माझा पक्षाने दणक्यात सुरुवात केली आहे. शिवसेनेला मात्र अपयश आल्याचे दिसतं आहे. रामटेक नगरपालिकेतील शिवसेनेच्या सत्तेला भाजपाने सुरुंग लावत विजय मिळवला आहे. भाजप आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेकमध्ये आपला डेरा जमवला होता.
पक्षात झालेल्या बंडखोरीचा शिवसेनेला विदर्भात मोठा फटका बसण्य़ाची चिन्हं दिसतं आहेत. रामटेक पालिकेतील 17 जागांपैकी भाजपाने 13 जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. रामटेकचे नगराध्यक्षपदी भाजपाचे दिलीप देशमुख विजयी झाले आहेत. विदर्भ माझा पक्षाला या पालिकेत खातंही उघडला आलं नाही.