होळीच्या नावाने रामूचा शिमगा

By Admin | Published: March 13, 2017 09:06 AM2017-03-13T09:06:56+5:302017-03-13T11:41:00+5:30

राम गोपाल वर्मा आणि वाद हे जणू समीकरणच झालं आहे.

Ramu Shimga by the name of Holi | होळीच्या नावाने रामूचा शिमगा

होळीच्या नावाने रामूचा शिमगा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - राम गोपाल वर्मा आणि वाद हे जणू समीकरणच झालं आहे. वादग्रस्त ट्विट करण्यासाठी दिग्दर्शक राम गोपाल वर्मा प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महिला दिनी अभिनेत्री सनी लिओनीचा उल्लेख करत केलेल्या आक्षेपार्ह ट्विटचा वाद क्षमत नाही तोच आणखी एक ट्विट करून राम गोपाल वर्मानं लोकांची नाराजी ओढवून घेतली आहे. होळीच्या शुभेच्छा देताना त्याची संकुचित मनोवृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे.

राम गोपाल वर्मा म्हणाला, वर्षातला हा एकमेव असा सण आहे की जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहण्याची मज्जा लुटू शकतात. तसेच एकमेकांना स्पर्श करू शकतात. कोणत्या देवानं कोणत्या राक्षसाचा वध केला हे मला माहीत नाही, मात्र असे बोल्ड क्षण ज्या राक्षसांमुळे निर्माण झाले आहेत त्यांचे मी आभार मानतो, असंही रामू म्हणाला आहे.

120 कोटी जनतेपैकी एकाला तरी होळी सण का साजरा करतात याचं कारण माहीत असेल का, याची मला शंका आहे. मात्र त्यांना भांग पिण्यासाठी कोणतंही कारण लागत नाही, असंही त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे धुळवडीच्या दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर रंगांची चिखलफेक होऊन टीकेचेच रंग पुन्हा उधळले जाण्याची शक्यता आहे.
(सनी लिओनीचा आदर्श ठेवा, महिला दिनी रामूचा अजब सल्ला)

तत्पूर्वी, सतत वादग्रस्त टिप्पणी करत चर्चेत राहणारा दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याने  'महिला दिना'निमित्त वादग्रस्त ट्विटची परंपरा कायम ठेवली होती. 'हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीचा आदर्श समोर ठेवा आणि पुरुषांना आनंद द्या' असा अजब सल्ला रामूने महिलांना दिला होता. एवढेच नव्हे तर ' महिला दिनाला पुरुष दिन म्हणावे कारण महिलांपेक्षा पुरुषच हा दिवस जास्त साजरा करतात,' असेही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.