रमजान ईद विशेष - पाण्याचा स्पर्श झाल्यावर आयातील दिसणारी रोहीणखेडची मशीद
By admin | Published: July 5, 2016 08:27 PM2016-07-05T20:27:14+5:302016-07-05T20:27:14+5:30
इ.स. १४३७ मध्ये बांधकाम करण्यात आलेली रोहीणखेड येथे एक प्राचिन मशीद आहे. या मशीदीच्या भिंतीवर आतील भागातून कुराणातील आयातील लिहील्या आहेत. या आयाती अदृष्य असून, पाण्याचा स्पर्श झाल्यावरच या
विवेक चांदूरकर
बुलडाणा : इ.स. १४३७ मध्ये बांधकाम करण्यात आलेली रोहीणखेड येथे एक प्राचिन मशीद आहे. या मशीदीच्या भिंतीवर आतील भागातून कुराणातील आयातील लिहील्या आहेत. या आयाती अदृष्य असून, पाण्याचा स्पर्श झाल्यावरच या
आयातील दृष्टीस पडतात. शेकडो वर्षांपूर्वी काही विशिष्ट द्रव्यापासून लिहिलेल्या या आयाती एकप्रकारचा चमत्कारच आहे.
अजिंठा पर्वत रांगांच्या पश्चिमेस नळगंगा आणि जलगंगा या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर रोहीणखेड हे प्राचिन गाव वसले आहे. निजामशाहीत रोहीणाबाद हे राजधानीचे शहर होते. इ.स. १४३७ मध्ये येथे खुदावंत खा महमदवीने एक मशीद बांधली.
या मशीदीमध्ये आतील भागाच्या भिंतीवर चहुबाजुने अरेबिक भाषेतील काही आयाती लिहील्या आहेत. या आयाती अदृष्य आहेत. मशीदीमध्ये प्रवेश केल्यावर या भिंतीवर काही लिहीले असावे असे निदर्शनास येत नाही.
मात्र, यावरून पाण्याने भिजलेला ओला कपडा फिरविल्यास सदर आयाती लाल अक्षरामध्ये दृष्टीस पडतात. हे एकप्रकारे आश्चर्यच असून, अशाप्रकारे आयाती असणारी ही एकमेव मशीद असण्याची शक्यता आहे. शेकडो वर्षांपूर्वी या
आयाती लिहीण्यात आल्या आहेत. मात्र या कोणत्या द्रव्यातून लिहीण्यात आल्या आहेत, याचा उलगडा अजूनही होवू शकला नाही.
ही मशीद सध्या पुरातत्व खात्याच्या अख्यत्यारीत आहे. त्यामुळे मशीद बंद असते तर केवळ शुक्रवारीच नमाज पडण्यासाठी मशीद खुली करण्यात येते. येथे पुरातत्व खात्याचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.
मशीदिचे बांधकाम संपूर्ण दगडात करण्यात आले आहे. मशीदीमध्ये एक कारंजाही आहे. तसेच मागच्या बाजुला दोन खोल्या आहेत. यामधील एका खोलीतून भुयार असल्याचे सांगण्यात येते. मध्ययुगीन कालखंडात बांधण्यात आलेली ही मशीद
निजामकालीन बांधकाम शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. इतिहास संशोधकांसाठी ही एक पर्वणी असून, याबाबत संशोधन करण्याची गरज आहे.