रानडे

By Admin | Published: January 19, 2016 09:06 PM2016-01-19T21:06:36+5:302016-01-20T12:42:42+5:30

शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक अशोक रानडे यांच्यावर टिकेकरांनी लोकमतच्या मंथन पुरवणीत ४ सप्टेंबर २०११ मध्ये लिहिलेला खालील लेख.

Ranade | रानडे

रानडे

googlenewsNext

२१व्या शतकाचा उंबरठा ओलांडण्याच्या संक्रमणावस्थेत साक्षेपी संपादक या नात्याने लोकमत परिवाराचा भाग बनलेल्या अरूण टिकेकरांचे १९ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले. टिकेकरांनी लोकमतमध्ये लिहिलेले निवडक लेख.

शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक अशोक रानडे यांच्यावर टिकेकरांनी लोकमतच्या मंथन पुरवणीत ४ सप्टेंबर २०११ मध्ये लिहिलेला खालील लेख.

रानडे

त्यांना सारखी हळहळ वाटे. ते म्हणत, ‘मी द्यायला तयार आहे; पण कु णी घ्यायला तयार नाही.’ महाराष्ट्राने त्यांची क दर के ली नाही, हे मात्र खरे. क धी क धी वाटते त्यांनी थोडी तडजोड के ली असती; थोडे जमवून घेतले असते.. तर?
 
रानडे हे ‘रानडे’ नव्हते, तेव्हापासूनची त्यांची-माझी मैत्री. ते वा्मयाचे विद्यार्थी. सिद्धार्थ क ॉलेजमध्ये शिक त. साहित्यात
त्यांनी एम. ए. के ले. तिथेच त्यांना सौभाग्यवती रानडे भेटल्या. त्या त्यांना ‘रा-ना-डे’ म्हणून हाक मारत. तेव्हापासूनची आमची ओळख. आमचे दोघांचे गुरू रा. भा. पाटणक र. 35 र्वष आम्ही एक मेकांना ओळखतो. या इतक्या वर्षाच्या काळात आम्ही आमचे गुरु रा. भा. पाटणकरांबद्दल एक मेकांना एवढय़ा गोष्टी सांगितल्या, एवढय़ा आठवणींबद्दल बोललो तरी त्या संपल्या नाहीत. पाटणक रांना वयाची 75 वर्ष पूर्ण झाली, तेव्हाची गोष्ट. त्यावेळी मी लोक सत्तेचा संपादक होतो. ‘लोक मुद्रा’ नावाचं एक
वा् मयीन पाक्षिक आम्ही प्रसिद्ध क रत असू. मराठी लेखक - विचारवंतांना ग्लॅमर नाही, ते मिळायला हवे, असा विचार क रू न आम्ही त्या पाक्षिकात लेखकाचा-विचारवंतांचा फोटो आणि त्याचे मनोगत प्रसिद्ध क रण्याचे ठरवले. आमचे फोटोग्राफ र होते मोहन बने. मी त्यांना पाटणकरांक डे पाठवले. ते गेले, त्यांनी बेल वाजवली. पाटणकरांनी दार उघडले. ते म्हणाले, ‘फोटो.’
ते म्हणाले, ‘आम्हाला नको फोटो.’ दार बंद. असा कोणी फोटो दारावर विकायला येतो का.? बनेंनी पुन्हा दार वाजवले. सांगितले, ‘मी तुमचा फोटो काढायला आलोय.’ पाटणक र घरातल्याच क पडय़ांत होते. आतल्या खोलीत गेले, शर्ट-पॅण्ट क पडे चढवून आले. बने म्हणाले, ‘तुम्ही नेहमी लिहायला जसे बसता तसाच फोटो काढायचाय.’ ते म्हणाले, ‘ठीके .’ पुन्हा आत गेले. घरातला पायजमा-शर्ट घालून आले. जुन्या नायलॉनचे कापड लावलेल्या आरामखुर्चीवर मांडी घालून बसले. हातात छोटेसे पॅड. म्हणाले, ‘काढा फोटो.’ बने म्हणाले, ‘तुम्ही टेबलापाशी नाही का बसत लिहायला.?’ पाटणक र म्हणाले, ‘आमच्या घरी टेबलच नाही.’
पण असा फोटो क सा काढायचा, असा प्रश्न बनेंना पडला. मग त्यांनी क साबसा शेजारच्यांचे टेबल वापरू न फोटो काढला.
मी हा सगळा कि स्सा अशोक रानडेंना सांगितला. रानडेंनी ऐकला; पण रानडेच ते.!
काही दिवसांनी रानडेंचा फोटो छापण्याची वेळ आली. फोटोग्राफ र गेले. तर रानडे लुंगी-बनियनवर. म्हणाले, ‘काढायचा असेल तर असा फोटो काढा, छापायचा असेल तर छापा.’ त्यांनी नाहीच ऐक लं, तसाच फोटो काढला आणि आम्ही तसाच फोटो छापला.
हे सांगायचे कारण असे क ी, ही माणसे क धीही तडजोडीला तयार होत नसत. रानडेंनी क धीही तडजोड के ली नाही. त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या ब:या-वाईट अवस्था मला माहिती आहेत. ते सगळे चढउतार मी  पाहिले आहेत. ते पाहून एक च वाटते, रानडेंसारख्या माणसांची कदर महाराष्ट्राने के ली नाही. अर्थात, हे त्यांचे नुक सान नाही. आपले नुक सान आहे. ते हळहळ क रत क ी, मी द्यायला तयार आहे; पण कु णी घ्यायला तयार नाही. अर्थात, रानडेंनी के लेल्या कार्याचे महत्त्व मोठे आहे. त्यांचे सगळ्यात मोठे सामथ्र्य कोणते, तर त्यांना प्रश्न पडत. प्रत्येक गोष्टीत प्रश्न पडत. त्यांचे परंपरेबद्दल ज्ञान पक्के होते. ते त्यांनी शिकू न घेतले होते. त्यातून ते पुढची उत्तरे शोधत. त्यांना पडलेले प्रश्न ते लोकांना विचारायचे. जे
सांगितले, जी माहिती मिळाली ती तपासून घ्यायचे. असे त्यांनी त्यांचे ज्ञान वाढवले. नवीन उत्तरे शोधली; पण हे सारे त्यांनी कुणाला सांगायचे.? मराठीत लिहिली असती पुस्तके , तर कोणी वाचली नसती. त्यांनी इंग्रजीत लिहिली. रानडे इतके छान बोलत; पण लिहित क्लिष्ट. अर्थात, अवघड लिहायचे म्हणून कोणी अवघड लिहित नसते. जिथे संक ल्पना येतात, तिथे त्या सारांशरू पात मांडाव्या लागतात. तिथे त्या अवघड होतात. अवघड शब्द वाचण्याचा प्रयत्न के ला, तर सोपे शब्द सापडत
राहतील. पण समाज वाचायला तयार नाही. रानडे तडजोडीला तयार नव्हते. ते म्हणाले, ‘मी असेच लिहिणार.
वाचायचे असेल तर वाचा.!’ रानडेंनी जे लिहिले, जे काम के ले त्याचे महत्त्व आजही आपल्याला क ळत नसले, तरी दहा वर्षानी क ळेल क ी, ते कि ती महत्त्वाचे आणि महान काम आहे. रानडय़ांची पुस्तके परदेशी व्यवस्थित गेली. इंग्रजी प्रकाशकांनी छापली, लोकांनी वाचली; पण महाराष्ट्राने त्यांना मानले नाही. ‘परंपरा’ही आणि ‘नवता’ही यातले काहीच धड नाही, अशी आपली
अवस्था आहे. रानडेंनी परंपरा पहिल्यांदा समजून घेतली. प्रत्येक पिढी ही साहित्याचं पूर्ण मूल्यांक न क रते. ज्याला ‘प्रेङोंटनेस ऑफ द पास्ट अॅण्ड पास्टनेस ऑफ द प्रेङोंट’ असे म्हणतात. रानडेंनी हे समजून घेतले. त्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्टीत एक वेगळा स्वतंत्र दृष्टिकोन दिला. ‘ऑपेरा’ त्यांनी आपल्या दृष्टिकोनातून समजून घेतला तो याच वृत्तीने.! क धीक धी वाटते, रानडे थोडीशी तडजोड सोसणारे, जमवून घेणारे असते तर.? आपले ध्येय काय, लोकांना समजावून सांगणो! त्यासाठी त्यांनी थोडी
तडजोड के ली असती तर.? पण तो त्यांचा स्वभाव नव्हता. खरे पाहता अशा तडजोडी न क रणा:या लोकांक डूनच महान कार्य
होत असते. रानडेंनी ते के ले. त्यांनी खूप दिले आपल्याला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे खूप मोठे नुक सान झाले. माझे व्यक्तिगत नुक सान खूप मोठे आहे. रानडे माङो मित्र, माङो गुरु बंधू. माङो गुरु जी गेले, माङो गुरु बंधूही. मी एक चांगला मित्र गमावला.
 
(शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक अशोक रानडे यांच्या मासिक श्रद्धांजली सभेत ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर यांनी केलेल्या भाषणाचा संपादित सारांश.)
 

 

Web Title: Ranade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.