राणेंचे बंड शमले!
By admin | Published: August 6, 2014 03:28 AM2014-08-06T03:28:11+5:302014-08-06T03:28:11+5:30
बंडाचे निशाण फडकविणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणो यांनी अखेर माघार घेतली असून, राजीनामा मागे घेत काँग्रेस पक्षातच कायम राहण्याचा निर्णय त्यांनी आज जाहीर केला.
Next
राजीनामा अखेर मागे : काँग्रेस पक्षातच राहण्याचा निर्णय
मुंबई : उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देऊन बंडाचे निशाण फडकविणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणो यांनी अखेर माघार घेतली असून, राजीनामा मागे घेत काँग्रेस पक्षातच कायम राहण्याचा निर्णय त्यांनी आज जाहीर केला. प्रचार समितीच्या प्रमुखपदावर राणो यांचा समेट झाल्याचे समजते.
पक्षश्रेष्ठींनी दिलेले मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन पाळले नाही, समर्थकांची झालेली गळचेपी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कार्यशैली, अशी कारणो पुढे करत राणो यांनी 21 जुलै रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी व पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेतली, मात्र त्यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे राणो काँग्रेसमध्येच राहणार की, बंड करून बाहेर पडणार याविषयी गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा होत होती.
राणो मंगळवारी सायंकाळी पत्र परिषदेत भूमिका जाहीर करणार होते. त्याआधीच प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ. शरद रणपिसे व कृपाशंकरसिंह त्यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर पोहोचले. एक तास बंदद्वार चर्चा केली. त्यानंतर राणो यांनी आपण राजीनामा मागे घेत असून, पक्षातच राहणार असल्याचे जाहीर केले. विधानसभेत पक्षाला विजय मिळवून देण्यास उद्यापासून राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सन्मानजनक वागणूक दिली जाईल, अशी हमी पक्षश्रेष्ठींनी दिली आहे आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीला सामुदायिक नेतृत्वाद्वारे सामोरे जाऊ, असे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे, असा दावाही केला.
प्रचार समितीचे प्रमुखपद
निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुखपद उद्योगमंत्री राणो यांना देण्यात येणार असल्याचे सूत्रंनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी राणोंशी केलेल्या चर्चेत त्यांना तसे आश्वासन श्रेष्ठींच्या वतीने दिले असल्याचे समजते.
तीन महिन्यांसाठी प्रदेशाध्यक्षपद!
तीन महिन्यांसाठी काँग्रेस श्रेष्ठींकडे प्रदेशाध्यक्षपद मागितले होते, गेल्या दोन आठवडय़ांत पक्ष प्रवेशासाठी काही राजकीय नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधला होता, असेही राणो म्हणाले.
नारायण राणो यांच्या निर्णयाचे स्वागत करतो़ भविष्याच्या दृष्टीने राणो यांनी योग्य निर्णय घेतला आह़े त्यांना सन्मान देण्याबाबतचा योग्य तो निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील़ - पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री़